आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच मुले पाण्यात बुडाली:कालव्यात 5 मुले बुडाली; चौघांना वाचवण्यात यश

चंद्रपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावली गावालगत आसोलामेंढा कालव्यात अंघोळीसाठी गेलेली पाच मुले पाण्यात बुडाली. यातील चौघांना वाचवण्यात यश आले, तर काजल अंकुश मक्केवार वाहून गेल्याने तिचा शोध सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सावली गावाला लागून असलेल्या असोलामेंढा नहर येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत रोहित अनिल मेडपल्लीवार (७) आणि अमित अनिल मेडपल्लीवार (५) यांच्यासह राहुल अंकुश मक्केवार (४), सुश्मिता अंकुश मक्केवार (८) व काजल अंकुश मक्केवार (५) ही पाच मुले गेली होती. या वेळी पाचही जण नहरीत अंघोळीसाठी उतरले. दरम्यान, पाचही मुले पाण्यात बुडू लागली. हे पाहून तेथे उपस्थितांनी आरडाओरड केली. तेथून जवळच असलेल्या शासकीय धान्य भांडारमधील कामगार बालू भंडारे यांनी तेथे धाव घेत कालव्यात उडी घेतली. भंडारे यांना चौघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, काजल वाहून गेली. घटनेची माहिती सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांना देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...