आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:नागपुरात कचराकुंडीत आढळले स्त्रीजातीचे 5 गर्भ, रॅकेटचा संशय, अवैधरीत्या गर्भपात केंद्र चालवले जात असल्याचा संशय

नागपूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्भ कचराकुंडीत सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. - Divya Marathi
गर्भ कचराकुंडीत सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

नागपूर येथील क्वेटा काॅलनीतील केटी वाइन शॉप्सजवळील कचराकुंडीत बुधवारी सायंकाळी स्त्रीजातीचे पाच गर्भ आढळले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सापडलेले गर्भ स्त्रीजातीचे असल्याने यामागे मोठे रॅकेट आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटलच्या आठवणी समोर आल्या. कदम रुग्णालयातील अवैध गर्भपाताच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. आर्वी येथील कदम रुग्णालयात १२ कवट्या आणि ५६ हाडे सापडली होती.

या प्रकरणासंदर्भात झोन थ्रीचे डीसीपी गजानन राजमाने यांच्याशी संपर्क साधला असता या ठिकाणी बायोमेडिकल वेस्टही सापडल्याची माहिती दिली. सापडलेल्या गर्भांपैकी काही गर्भ विकसित झालेले होते. त्यामुळे वैद्यकीय पथक या भागात तपासणी करत असून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा सर्व प्रकार कुणी केला, याचा तपास सुरू असल्याचे राजमाने यांनी सांगितले.

सापडलेल्या अर्भकांपैकी सर्व गर्भ स्त्रीजातीचे आहेत. बेवारस पद्धतीने सापडलेले गर्भ आणि त्याशेजारी असलेले औषधांचे बॉक्स यामुळे जवळपासच कुठेतरी अवैधरीत्या गर्भपात केंद्र किंवा सोनोग्राफी केंद्र चालवले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागपूर फॉरेन्सिक विभागाचे एक पथक घटनास्थळी आले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही स्थानिकांना हे गर्भ दिसले आणि त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. त्वरित कारवाई करत लकडगंज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. हे गर्भ नेमके कोणत्या रुग्णालयाचे आहेत, ते येथे कोणी आणून टाकले, यामागे मोठे रॅकेट तर नाही ना, याचा तपास पोलिस करीत आहेत.

सर्व शक्यता तपासू : पोलिस आयुक्त : या प्रकरणाचा तपास सर्व दिशांनी सुरू असल्याने आताच काही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. हे बायोमेडिकल वेस्टही असू शकते, कुणी दुरून येऊन येथे टाकलेले असू शकते, अशा सर्व शक्यता तपासून पाहू. घाईघाईने आताच कुणावर संशय व्यक्त करणे योग्य नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजूनपर्यंत तरी काही आढळलेले

चंद्रपूर जिल्ह्यातील पाच सोनोग्राफी व चार गर्भपात केंद्रांना नोटीस
गडचिरोली वर्धा जिल्ह्यातील अवैध गर्भपात प्रकरणाची गंभीरता पाहता चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांची धडक तपासणी मोहीम हाती घेतली. त्रुटी आढळलेल्या पाच सोनोग्राफी केंद्रांना व चार गर्भपात केंद्रांना नोटीस देण्यात आली असून एक गर्भपात केंद्र तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. त्रुटींची पूर्तता केल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शल्य चिकित्सक कार्यालयाची चमू फेरतपासणी करून अहवालाची शहानिशा करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...