आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत 50 मृत्यू:हल्लेखोर वाघाला जेरबंद न केल्यास निलंबनाचा इशारा

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यत एकूण 50 मृत्यू झाले आहे. यापैकी 44 वाघामुळे तर 6 बिबट्यामुळे झाले आहे. यातील चंद्रपूर प्रादेशिक विभागात 39 मृत्यू आहे. ताडोबात 9 आणि एफडीसीएममध्ये 2 मृत्यू झाले आहे.

जिल्ह्यात मानव - वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. हे थांबविण्यासाठी जनजागृती केली जात आहे. जंगलात जाणे अपरिहार्य असल्यास काय करावे आणि काय करू नये, याबाबत सूचना केल्या असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. हल्लेखोर वाघाला जेरबंद न केल्यास निलंबनासाठी तयार रहा असा इशारा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांनी शेतकरी आणि गावकऱ्यांवर हल्ला करून जीवितहानी होऊ नये व प्रसंगी मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवू नये म्हणून मुखवटे वाटप करण्यात आले आहेत. बीएनएचएसतर्फे पहिल्या टप्प्यात 100 आणि दुसऱ्या टप्प्यात 147 मानवी मुखवटे वाटले. पहिल्या टप्प्यात शेतकरी व गुराखी आणि दुसऱ्या टप्प्यात गुराख्यांना जून 2022 मध्ये दिले, अशी माहिती बीएनएचएसचे संजय करकरे यांनी दिली. लोकांनी सुरूवातीला वापरून वापरणे बंद केले. मूल बफर क्षेत्रातील करवन, काटवन, मारोडा या परिसरात वाटले. जंगलाला लागून असलेल्या शेतीत प्रयाेग केला.

जिल्ह्यात अलीकडे मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत. 2006 मध्ये मानव-वन्यजीव संघर्षाच्या केवळ 9 घटना होत्या. त्यात वाढ होऊन 2018 मध्ये 917 घटनांची नोंद झाली आहेत. यातील सर्वाधिक 55 टक्के घटना ब्रम्हपुरीत, 25 टक्के चंद्रपूर आणि 20 टक्के घटना मध्य चांदा वनविभागात घडल्या आहेत. वन्यजीव आणि मानव दोघांचेही प्राण वाचवायचे असेल तर वनविभाग, ग्रामीण नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पुढारी यांनी एकत्र येऊनच या समस्येवर मात करता येईल.

ताडोबा बफरमध्ये 9 जण वाघाच्या हल्ल्यात ठार. यातील 4 जणांना 20 लाख तर 5 जणांच्या कुटुंबीयांना 15 लाखांप्रमाणे मदत मिळाली आहे, अशी माहिती टीएटीआरचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे. बांबू, लाकूड फाटा, सरपण, गवताचे झाडूसाठी लोक जंगलात जातात. वाघ आणि माणूस समोर येण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. आपण स्वत:ची काळजी घेणार नाही तोपर्यत अशा घटना घडणं थांबणार नाही, असे करकरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...