आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • 60 Lakhs Worth Of Gold And 13 Lakhs Worth Of Lumpas In Shantinagar; The Complainant's Son, The Servant Of The Shop Turned Out To Be The Thief

नागपुरात घरफोडी:शांतीनगरात 60 लाखांचे सोने व 13 लाखांची रक्कम लंपास; तक्रारदाराचा मुलगा, दुकानातील नोकरच निघाला चोर

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर शहरात 60 लाखांचे सोने व 13 लाखांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शांतीनगर येथे घडली होती. सदरील या घटनेचा उलगडा गुन्हे पोलिस शाखेच्या पोलिसांनी 24 तासांत केला आहे.

तक्रारदाराचा मुलगा आणि दुकानातील नोकरच आरोपी निघाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी ही लूट करून सौदी अरेबिया येथे पळून जाणार असल्याचे तपासात पुढे आले आहे. जाफर जावेद थारा आणि वाजिद गफूर अली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्ह्याची दिली कबुली

शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कपील नगर येथे राहाणारे जावेद अब्दुल थारा रविवारी कुटुंबासह बाहेर गेले होते. यावेळी चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून इलेक्ट्रॉनिक लाॅकर उघडून त्यातील 13 लाख रुपये आणि सोन्याचे दीड किलो वजनाचे दागिने असा 70 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाा. इलेक्ट्रॉनिक लॉकर उघडून रक्कम पळवण्यात आल्याने लाॅकरचा कोड माहिती असणाऱ्याने ही चोरी केली असावी अशी शंका गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आली. त्यामुळे त्यांनी जावेद अब्दुल रजा खारा त्यांच्या दुकानातील कामगार आरोपी वाजिद गफूर अली याची चौकशी केली. तेव्हा त्याने या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. शिवाय जाफर जावेद थारा हा सायंकाळी 7 ते रात्री 8.30 दरम्यान कामठी येथे कुटुंबासोबत नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावरही लक्ष केंद्रीत केले होते.

नक्की घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार शांतीनगर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या कश्यप नगर येथील जावेद अब्दुल रज्जाक थारा (वय 56) घराला कुलूप लावून कुटुंबासह कामठी येथे सगाईच्या कार्यक्रमासाठी गेले होते. जातांना घर नीट बंद केले आहे, सगळीकडे कुलूपे लागलेली आहे याची खात्री करून ते बाहेर पडले होते. रात्री बाहेरून घरी परत आल्यावर घराला लावलेले कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी 13 लाख रोकड आणि दीड कीलो वजनाचे 60 लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

चोरी झाल्याने लक्षात येताच जावेद यांनी लागलीच शांतीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. माहिती मिळताज गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्यासह बड्या पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. रात्रभर हा तपास सुरू होता. यात पोलिसांना जवळच्या माणसाने टिप दिल्याचा संशय असल्याने त्यांनी दुकानातील नोकर आणि जाफर जावेद थारा यांना ताब्यात घेत चौकशी केली असता खरा प्रकार उघडकीस आला.

बातम्या आणखी आहेत...