आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:राज्यभरातील 486 संस्थांकडे सापडले 656 काेटी रु., चार मास्टरमाइंड अटकेत

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बनावट पावत्यांवर इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरण, 7.27 कोटींची रोकड जप्त

बनावट पावत्यांवर खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्याच्या प्रकरणात जीएसटी महासंचालनालयातील गुप्तचर विभागाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ या दोन महिन्यांत राबवलेल्या मोहिमेअंतर्गत राज्यातील ४८६ संस्थांकडे ६५६ काेटी २२ लाख रुपये सापडले. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावरून सुमारे ७ कोटी २७ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

डीजीजीआयच्या नागपूर विभागाने राज्यभर राबवलेल्या मोहिमेत अनेक गैरप्रकार उघडकीस आले. कर चुकवण्यासाठी व्यापारी तसेच उद्योजकांनी निरनिराळ्या क्लृप्त्या लढवल्या. मसाले, सुकामेवा, सिमेंट, लोखंड, स्टील उद्योजकांनी अस्तित्वात नसलेल्या मालमत्ता दाखवल्या. वीज बिल तसेच भाडे करारासाठी बनावट पत्त्यांच्या आधारे कागदपत्रे तयार करून सादर केली. प्रत्यक्षात कोणताही व्यवहार न करता केवळ कागदोपत्री सर्व व्यवहार झाल्याचे दाखवून बनावट पावत्यांवर खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट घेत या बनावट क्रेडिटचा उपयोग जीएसटी विवरणपत्र दाखल करण्यासाठी करीत असल्याचे उघड झाले.

तब्बल ११८ कोटी १२ लाख रुपयांची बनावट देयके
तब्बल ११८ कोटी १२ लाख रुपयांच्या बनावट देयकांच्या माध्यमातून ६५६ कोटी २२ लाखांचा इनपुट टॅक्स क्रेडिट उकळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश जीएसटी महासंचालनालयातील गुप्तचर विभागाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...