आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा पाऊस चांगला झाल्यामुळे धरणे तुडुंब भरली आहेत. यामुळे पाण्याची चिंता मिटल्याचे दिसते. जलसंपदा विभागाच्या अहवालात महाराष्ट्राचा विचार करता १४१ मोठ्या धरणांमध्ये सध्या ६९.३९ टक्के पाणी साठा झालेला आहे. महाराष्ट्रातील २५८ मध्यम प्रकल्पाचा विचार करता यात ६६.३७ टक्के पाणीसाठा झालेला आहे. लघु प्रकल्पाच्या २८६८ धरणांचा विचार करता यात ५२.०२ टक्के पाणीसाठा आहे.
अमरावती विभागातील २५ मध्यम प्रकल्पांत ६०.९८% (गेल्या वर्षी याच दिवशी ७३.७४%), औरंगाबाद विभागातील ८१ मध्यम प्रकल्पांत ७३.९५% (६१.०८%), कोकण विभागातील ७ मध्यम प्रकल्पांत ६८.८३% (७४.७८%), नागपूर विभागातील ४२ मध्यम प्रकल्पांत ४८.१२% (३७.७२%), नाशिक विभागातील ५३ मध्यम प्रकल्पांत ६०.४१% (५७.०१%) व पुणे विभागातील ५० मध्यम प्रकल्पांत ७६.०२% (६४.४७%) इतका पाणीसाठा आहे.
पुणे विभागातील ७२६ धरणांमध्ये ७२.१५ टक्के पाणीसाठा असून कोकण विभागातील १७६ धरणांत ६३.४४ टक्के पाणीसाठा झालेला आहे. नाशिक विभागातील ५७१ धरणांत ६१.१३% पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागातील ९६४ धरणांत ७०.०२% पाणीसाठा आहे. विदर्भातील अमरावती विभागात असलेल्या ४४० धरणांत ६२.७ टक्के पाणीसाठा आहे. तर नागपूर विभागातील ३८४ धरणांत ५२.८३ टक्के पाणीसाठा झालेला आहे.
औरंगाबाद विभागात ७४.२५ टक्के साठा
राज्यात अमरावती विभागात १०, औरंगाबाद ४५, कोकण ११, नागपूर १६, नाशिक २४ व पुणे विभागातील ३५ अशी एकूण १४१ मोठी धरणे आहेत. यात २१ मार्च रोजी अमरावती विभागातील धरणांमध्ये उपयुक्त जलसाठा ६३.२४ टक्के (गेल्या वर्षी याच दिवशी ६०.४३ टक्के), औरंगाबाद विभागात ७४.२५ टक्के (७४.८३), कोकण विभागात ६३.९१ टक्के (५७.९३), नागपूर विभागात ५४.५२ टक्के (५९.५९), नाशिक विभागात ६५.३४ टक्के (६४.६१) आणि पुणे विभागात विभागात ६९.३९ टक्के (६२.०६) इतका पाणीसाठा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.