आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला विदर्भात पडले खिंडार:विदर्भातील युवा सेनेचे 7 जिल्हाप्रमुख, 13 पदाधिकारी शिंदे गटात

नागपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला विदर्भात खिंडार पडले असून १३ पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना गटाचे विदर्भाचे प्रमुख किरण पांडव यांनी दिली. शिवसेनेचे ४० आमदार आणि अनेक जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी आपल्या बाजूने वळवल्यानंतर शिंदे सेनेने उद्धव ठाकरेंपाठोपाठ विदर्भात आदित्य ठाकरेंना जबर धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पूर्व विदर्भातील युवासेनेचे पदाधिकारी शिंदे गटामध्ये सहभागी झाल्याचे पांडव यांनी सांगितले. विदर्भातील युवा सेनेच्या हर्षल शिंदे (युवासेना जिल्हाप्रमुख, चंद्रपूर), शुभम नवले (युवासेना जिल्हाप्रमुख, नागपूर ग्रामीण), रोशन कळंबे (युवासेना जिल्हाप्रमुख, भंडारा), दीपक भारसाखरे (युवासेना जिल्हाप्रमुख, गडचिरोली), कगेश राव (युवासेना जिल्हाप्रमुख, गोंदिया), नेहा भोकरे (युवती सेना जिल्हाप्रमुख, नागपूर), सोनाली वैद्य (युवती सेना जिल्हाप्रमुख, नागपूर ग्रामीण), प्रफुल्ल सरवान (जिल्हा समन्वयक आणि नगरसेवक भद्रावती, चंद्रपूर), राज तांडेकर (जिल्हा समन्वयक, नागपूर), लखन यादव (जिल्हा समन्वयक, रामटेक), कानाजी जोगराणा (जिल्हा चिटणीस, नागपूर), अभिषेक गिरी (उप-जिल्हा प्रमुख, नागपूर ग्रामीण), सुनील यादव (रामटेक विधानसभा समन्वयक) यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.

बातम्या आणखी आहेत...