आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफडीएची मोठी कारवाई:नागपुरात 73 लाखांची सडकी सुपारी जप्त; विक्रेत्यांना अटक

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत विविध ठिकाणी धाडी टाकून अन्न व औषधी प्रशासनाने 73 लाख 49 हजार 499 रुपयांचा सडक्या व भेसळयुक्त सुपारीचा तर 2 लाख 65 हजार किमतीचा गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखुचा साठा जप्त केला आहे.

विक्रेत्यांना अटक

एफडीएचे सहायक आयुक्त प्रशांत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेर ट्रेडींग कंपनी, शांतीनगर, क्वालिटी ट्रेडर्स कळमना, गुरू ट्रेडर्स, मस्कासाथ व ज्योती गृहउद्योग वाठोडा या प्रतिष्ठानांवर एफडीएने ही कारवाई केली आहे. जप्त केलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. सडकी सुपारी, गुटखा, सुगंधीत तंबाखूची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना अटक करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.

एफडीएने वारंवार धाडी टाकीत माल जप्त केला

एफडीएकडून नियमितपणे विविध प्रतिष्ठाने तसेच पेढ्यांची तपासणी करून प्रसंगी धाडी टाकल्या जातात. बंदी असलेल्या पदार्थांची वाहतूक, साठा आणि विक्री करू नये असे आवाहन एफडीएने केले आहे. यापूर्वीही एफडीएने वारंवार धाडी टाकीत माल जप्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...