आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आपत्तीत मदतीसाठी राज्यात ८ हजार "आपदा मित्र''‎, रेस्क्यू, रिलिफ आणि रिहॅबिलिटेशनसाठी करणार मदत

प्रतिनिधी |नागपूर‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यापुढे भूकंप, त्सुनामी, महापूर,‎ बॉम्बस्फोट, रस्ते अपघात आदी‎ नैसर्गिक आपत्तीत आपत्ती‎ व्यवस्थापन प्राधिकरणाच्या‎ चमूसह आपदा मित्र आणि आपदा‎ सखी ही मदतीला धावून येतील.‎ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन‎ प्राधिकरणाचा आपदा मित्र‎ कार्यक्रमाची अंमलबजावणी‎ राज्यातील २० जिल्ह्यांत करण्यात‎ येत असून यासाठी ७ हजार ९००‎ जणांची निवड करण्यात आलेली‎ आहे, अशी माहिती राज्य आपत्ती‎ व्यवस्थापन प्राधिकरणाचे राज्य‎ समन्वयक सागर वाळजु यांनी‎ दिली. या आपत्ती मित्रांना मानधन‎ दिले जाणार नाही. त्यांचा तीन‎ वर्षांसाठी पाच लाख रूपयांचा‎ विमा काढण्यात आला आहे. या ‎ शिवाय १५ हजार रुपयांची एक ‎ ‎ माउंटरिंग बॅग देण्यात आली आहे.‎

यामध्ये नागपूर, अहमदनगर,‎ पुणे, नाशिक, नांदेड, ठाणे,‎ सातारा, जळगाव, मुंबई शहर‎ आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांत ‎ ‎ प्रत्येकी ५०० आपदा मित्र,‎ गडचिरोली, चंद्रपूर, रत्नागिरी,‎ भंडारा, परभणी, अमरावती,‎ नंदुरबार, सांगली, रायगड या‎ जिल्ह्यांत प्रत्येकी ३०० आणि‎ सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० आपत्ती‎ मित्र व सखी राहाणार असल्याची‎ माहिती वाळजु यांनी दिली.‎ निवड झालेल्या सर्व आपत्ती‎ मित्रांचे दहा ते बारा दिवसांचे‎ रितसर निवासी प्रशिक्षण करण्यात‎ आले. यात भूकंप, त्सुनामी,‎ महापूर, बॉम्बस्फोट, रस्ते अपघात,‎ जंगली प्राण्यांचे रेस्क्यू इत्यादी‎ विषयावर सविस्तर माहिती व‎ बचाव करण्यासाठीचे प्रशिक्षण‎ देण्यात आले आहे. भविष्यात‎ आपदा मित्रची जबाबदारी‎ महत्वाची राहणार आहे. यासाठी‎ सर्व प्रशिक्षणार्थींना व्यवस्थित‎ प्रशिक्षण देण्यात आल्याचे यांनी‎ सांगितले.‎

आपत्तीच्या वेळी प्रशासनाला‎ सर्वसामान्य नागरिकांचे सहकार्यही‎ मिळण्याची गरज आहे. रेस्क्यू,‎ रिलिफ आणि रिहॅबिलिटेशन या‎ तीन आरची आपत्तीचा सामना‎ करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका‎ आहे. या योजनेचा उद्देश समुदाय‎ स्वयंसेवकांना आपत्तीनंतर त्यांच्या‎ समुदायाच्या तत्काळ गरजांना‎ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक‎ कौशल्ये प्रदान करणे आहे. निवासी‎ प्रशिक्षणामध्ये अग्निशमन‎ प्रात्यक्षिक, रोड सेफ्टीबाबत‎ जनजागृती, बोट कशी‎ चालवायची, विषबाधा झाल्यास‎ काय करावे तसेच प्राथमिक‎ उपचार, पूर, भूकंप इत्यादी‎ आल्यास काय करावे याबाबत‎ प्रशिक्षण देण्यात आले आहे.‎ नागरिकांना आपत्तीच्या काळामध्ये‎ आपदा मित्र व सखी यांची मदत‎ होणार आहे.‎