आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात:छायाचित्र मॉर्फ केल्याची धमकी देत तरुणीकडून उकळले 9 लाख

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरच्या कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका तरुणीला इंस्टाग्रामवरून ओळख झालेला एक तरुण धमकावत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच तरुणीचे छायाचित्र मॉर्फ करुन ते व्हायरल केल्याची धमकी दिली होती. पण त्याने तिच्याकडून 9 लाख रुपये उळल्याची बाब देखील समोर आली. सदरील या प्रकरणी तरुणीने मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

24 तास सेवा सुरू राहणार

सायबर पोलिस ठाणे स्वतंत्र इमारतीत जाताच एक पीडितने तिच्या फसवणुकीची पहिली तक्रार ऑनलाईन दाखल केली आहे. सदर परिसरातील छावणी भागातील पटेल बंगला येथे स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याचे उद्घाटन मंगळवारी दुपारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते झाले. येथे अत्याधुनिक सुविधेसोबत आधुनिक प्रणाली लावण्यात आली आहे. हे पोलिस ठाणे 24 तास सुरू राहाणार आहे.

विनयभंग आणि फसवणुकीची तक्रार दाखल

नागपूर शहरातील नागरिकांना आता कोणत्याही तक्रारीसाठी पोलिस ठाण्याच्या चकरा माराव्या लागणार नाही. छावणी परिसरातील पटेल बंगला या ठिकाणी स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याची सुरुवात करण्यात आली आहे. सोबतच नागपूर शहरात आता सीसीटीएनएस (क्राईम अ‍ॅण्ड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क अ‍ॅण्ड सिस्टिम) गो-लाईव्ह प्रणालीची सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही गुन्हेगारी संदर्भात नागरिक ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतील. उद्घाटनाच्या दिवशी सायबर पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग आणि फसवणुकीची तक्रार ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात आली.

शहरात स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन

2008 मध्येच नागपूर शहरात स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे तयार करण्याचा जीआर काढण्यात आला होता. पण शहरात सीसीटीएनएस गो लाईव्ह पद्धत ही यंत्रणा नसल्याने आतापर्यंत स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन सुरू होऊ शकले नव्हते. त्यामुळे नागरिक ऑनलाईन तक्रारी दाखल करू शकत नव्हते. पण नागपूर शहरात आता स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन सुरू झाल्याने नागरिक ऑनलाईन तक्रारी दाखल करणार करू शकणार आहेत. हे स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन 24 तास नागरिकांच्या सेवेत असेल. यासोबतच नागपूर शहरातल्या सर्व पोलिस स्टेशनमध्ये एक अधिकारी आणि पाच पोलिस कर्मचाऱ्यांची सायबर क्राईम संदर्भातल्या केसेस साठी नेमणूक करण्यात आले आहे.

खबरदारी घेण्याचे आवाहन

डिजिटल विश्वात जगत असताना डिजिटल गोष्टी, डिजिटल अर्थकारण, डिजिटल खरेदी, इत्यादी गोष्टींचा वापर वाढला. मात्र या वाढत्या वापरासोबत याचा गैरफायदा घेणारेही लोक तितकेच वाढले. चोरीच्या, फसवणुकीच्या नवनव्या क्लुप्त्या करुन लोकांना गंडवण्याचे अनेक प्रकार ऑनलाईनच्या चक्करमध्ये सुरु झाले. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...