आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडावर वीज पडल्याने 9 माकडांचा मृत्यू:वलनी वस्ती शिवारातील घटना, मंदिरातील इलेक्ट्रिक साहित्यही जळाले

नागपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामस्थांनी जेसीबीच्या मदतीने एक मोठा खड्डा तयार करुन मृत माकडांना पुरले. - Divya Marathi
ग्रामस्थांनी जेसीबीच्या मदतीने एक मोठा खड्डा तयार करुन मृत माकडांना पुरले.

जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वलनी पोलीस चौकी परिसरातील वलनी वस्ती शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेत नऊ माकडांचा मृत्यू झाला. तर, एका मंदिरातील साहित्य जळाले.

विजेच्या झटक्याने खाली कोसळले

दुपारी बारा वाजेपासून खापरखेडा परिसरात मुसळधार पावसासह विजेचा कडकडाट सुरू होता. दरम्यान, एक वाजता वलनीवस्ती जवळील कन्हान नदी काठच्या पिंपळाच्या झाडावर वीज पडली. या झाडावर माकडांचा कळप होता. वीज पडल्याने झाडावर दडून बसलेले एक नर माकड, सात मादी आणि एक मादी पिल्लू भाजून खाली पडून मरण पावले.​​​​​​​​​

गावातीलच नंदकिशोर अंबिलडुके घटनास्थळी पोहचला असता त्यांना झाडाखाली मृत माकडे दिसून आली. याची माहिती त्यांनी ग्रामपंचायत वलनी, वनविभाग खापा आणि स्थानिक जनप्रतिनिधीना दिली. वन्य जीव प्रेमी दद्दू गणवीर, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे घटनास्थळी पोहचले. वनविभागाचे आश्विन काकडे, वनरक्षक रेखा चोंदे, वनरक्षक अनिल राठोड, क्षेत्र सहायक पीएसआय नामदेव धांडे, ग्रा. पं. सदस्य रंगराव कांबळे, शिपाई सदानंद नारनवरे यांनी पंचनामा केला. गावातून एक जेसीबी बोलावून घटनास्थळी एक खड्डा तयार करून सर्व मृत माकडांना जमिनीत पुरविण्यात आले.

मंदिराचेही नुकसान

दुसरी घटना वलनी वस्तीत घडली. वलनी वस्तीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसावर वीज पडली. मंदिराच्या कळसावर लाईट लावले होते. त्या कळसापासून मंदिरातील आतील भागातील सर्व वायर जळाली. मंदिरात लागलेले सर्व लाईटही फुटले.

बातम्या आणखी आहेत...