आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नायलॉन मांजाने गळा कटून तरूणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना येथे घडली. प्रणय ठाकरे (वय २०) हे या तरूणाचे नाव आहे. तो मानेवाड्यातील ज्ञानेश्वर नगर येथे राहतो. घटनेच्या वेळी आपल्या एमएच ३१, व्हीएस ५२०५ क्रमाकांच्या अॅक्टीव्हावरून जात होता. त्यावेळी दोघे जण अडकलेला मांजा खिचत होते. त्याच्या उजव्या बाजूने आलेल्या मांजाने मान कापल्या जाऊन तो खाली पडला. लोकांनी त्याला मेडिकलमध्ये भरती करेपर्यंत खूप रक्तस्त्राव झाला होता. मेडिकलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच मानेवाड्यात सौरभ पाटणकर (वय २२) याचा मांजामुळे हात कापल्याची घटना समोर आली आहे.
गेल्या १० दिवसांत नायलॉन मांजाने घेतलेला प्रणय हा तिसरा बळी आहे. यापूर्वी वंश तिरपुडे आणि एंटा सोळंकी या दोन मुलांना नायलॉन मांजामुळे जीव गमावला आहे. नायलॉन मांजामुळे संक्रांतीच्या काळात पशुपक्ष्यांना हमखास इजा होते. हा मांजा रस्त्यात, झाडावर किंवा इतरत्र अडकल्याने नागरिकांच्या जिवालाही घातक ठरतो. त्यामुळे अनेक नागरिकांना, तसेच पक्ष्यांनाही गंभीर इजा झाल्या आहेत. या मांजामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे मागील वर्षी शंभरच्या वर नागरिक जखमी झाले होते. मात्र, तरीही यातून बोध घेतला जात नसून या मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.