आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत्रानगरीत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नागपुरात मुक्कामी आहेत. हीच संधी साधत भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांच्या अवमानावरून टीका केली होती. त्यामुळे या दोघांच्या भेटीची चांगलीच चर्चा दिवसभर रंगली रंगली होती.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या एका कार्यक्रमांत महापुरुषांनी भीक मागून संस्था उभ्या केल्या होत्या, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याचा उद्रेक म्हणून पुण्यात पाटील यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी ११ पोलिसांचे निलंबनही करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांनी हे निलंबन मागे घेण्यात आले होते. दरम्यान, आपल्या भेटीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरे यांचे एक पुस्तक भेट दिले आणि या पुस्तकातील ‘भीक मागणे’ या संदर्भातील उल्लेख वाचून दाखवला. या पुस्तकात ‘एखाद्या कार्यासाठी निधी गोळा करणे म्हणजे भीक मागणे असाच अर्थ होतो’, असा उल्लेख आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना वाचून दाखवले. या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते प्रसाद लाड तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबतच इतर नेतेही उपस्थित होते. या वेळी ठाकरे आणि पाटील यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, चर्चेचा तपशील कळू शकला नाही.
पुस्तकातील ओळी पाहून उद्धव ठाकरेंचे केवळ स्मित चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘माझी जीवनगाथा’ हे पुस्तक भेट दिले. याच पुस्तकात एखाद्या कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे असाच अर्थ होतो, असा उल्लेख आहे. हा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दाखवला. या भेटीचा व्हिडिओही आता समोर आला आहे. यात उद्धव ठाकरे केवळ स्मितहास्य करताना दिसत आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. उद्धव ठाकरे यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.