आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:ओडिशाला मजूर घेऊन जाणाऱ्या बसचा वर्ध्यात अपघात, तीन मजूर गंभीर जखमी

वर्धा 2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नागपूर-अमरावती महामार्गावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात

लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले होते.केंद्राने मंजुरी दिल्या नंतर खाजगी बसने गावाकडे जात असलेल्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने जिल्ह्यातील कारंजा मार्गावर बसचा अपघात पहाटेच्या सुमारास घडला असून,या अपघातात तीन मजूर गंभीर जखमी झाले आहे. 

कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रा कडून लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत अनेक कामगार अडकले होते.केंद्र  व राज्य सरकारने गावी जाण्याची परवानगी दिली असल्यामुळे गुजरात राज्यातील सुरत येथे अडकले मजूर ओडिशा राज्यातील गनजाम येथे जी जे १४ झेड २५११ या खाजगी बसने ५० मजूर परतीचा प्रवास करीत होते.दिनांक २ मे रोजी रात्रीच्या सुमारास ही बस मजूरांना घेऊन जात असते वेळेस वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील नागपूर-अमरावती महामार्गावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात दिनांक ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास टोल नाक्याजवळ घडला असून,या अपघातात तीन मजूर गंभीर जखमी झाले असून,त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...