आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • A Couple Of Lovers Committed Suicide By Jumping In Front Of The Train And The Mobile Phone Was Shattered. Incident Between Gumgaon Khapri

प्रेमी युगुलाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्त्या:मोबाईलच फुटल्याने पटली नाही ओळख; गुमगाव-खापरी दरम्यान घटना

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर दुरांतो एक्स्प्रेसमोर उडी घेत प्रेमी युगुलाने आत्महत्त्या केल्याची घटना गुरूवारी घडली. या प्रकरणी मृतकांची ओळख अजूनही पटलेली नाही. शुक्रवारीही पोलिस ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार आहे. मृत तरुणाच्या छातीवर हृदयाचे चिन्ह आहे. ते प्रेमी युगुल असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. ही घटना गुरुवारी हिंगणा परिसरातील गुमगाव-खापरी दरम्यान संदेश सिटीजवळ घडली. हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर डाउन ट्रॅकवर 20-22 वर्षांचे तरुण ट्रेन क्रमांक 12289 दुरांतो एक्स्प्रेससमोर आले. ट्रेनचा वेग जास्त असल्याने दोघेही जवळपास 500 मीटरपर्यंत ओढले गेले. अपघातात त्यांच्या शरीराचे तुकडे झाले. ट्रेन चालकाने हाॅर्न वाजवूनही दोघे रूळावरून मागे हटले नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी हिंगणा पोलिसांना माहिती दिली. हिंगणाचे ठाणेदार विशाल काळे हे साथीदारांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. पोलीस मृतांची ओळख पटवून घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

दोघांचे मोबाईल झाले चक्काचूर

त्यांच्या मोबाईलवरून काही माहिती मिळेल, अशी अपेक्षा पोलिसांना होती, मात्र त्यांचे दोन्ही मोबाईल तुटून चक्काचूर झाले. त्याच्या पायात दोरी बांधण्यात आल्याची चर्चा आहे. दोघांनीही रोजच्या वापराचे कपडे घातले होते. त्याच्याकडे काही सामान नव्हते. घटनास्थळी त्याची ओळख पटविण्यासाठी काहीही आढळून आले नाही. दोघांचेही मृतदेह मेडिकल हॉस्पिटलच्या विच्छेदन कक्षात ठेवण्यात आले आहेत. त्यांच्याबद्दल कुठेतरी हरवल्याची तक्रार आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपासही सुरू आहे. या दरम्यान दुरंतो एक्स्प्रेस येत होती. ‘लोको पायलट’ने जोरजोरात हॉर्न वाजवला. परंतु, दोघेही रुळावरून बाजूला झाले नाही. क्षणार्धात दोघांनाही भरधाव रेल्वेने धडक दिली. या धडकेत दोघांनाही जवळपास 500 मीटरपर्यंत फरफटत नेले. दोघांच्याही शरीराचे अनेक तुकडे झाले.

प्रेमी युुगुल आत्महत्या करण्यासाठी आले होते की त्यांचा रेल्वेसमोर फेकून खून झाला, असा संशय निर्माण झाला आहे. मृत प्रेमी युगुलाबाबत मोबाईलद्वारे काहीतरी माहिती पोलिसांना मिळवणे शक्य होते. मात्र, दोघाचेही मोबाईल पूर्णपणे फुटले आहेत. प्रेमी युगुलाच्या पायाला दोरी बांधलेली होती. त्यामुळे त्यांचा अपघात की घातपात असा संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...