आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भात खायला न दिल्याने मित्राचा राग अनावर:डोक्यात लाकडी दांडा मारुन वृद्धाचा खून, संशयिताला अटक

नागपूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाताचा अर्धा हिस्सा घ्यायला न दिल्याच्या रागातून एका 75 वर्षीय वृद्धाचा डोक्यात लाकडी दंडा मारून खून केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली. अरविंद बापूराव बारब्दे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर देवराव उर्फ वासुदेव रमेशराव बारस्कर (वय 38) असे आरोपीचे नाव आहे.

दोघांमध्ये झाला वाद

मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिल्यानंतर जेवणकरताना अरविंद बारब्देने भात एकट्यानेचे खाऊन घेतला. यावरून देवराव बारस्कार (वय 38 वर्षे) आणि अरविंदमध्ये वाद झाला. संतप्त देवरावने रागाच्या भरात भाताचा हिस्सा न दिल्याने अरविंदच्या डोक्यावर काठी मारून हल्ला केला व अरविंदचा खून केला.

काय आहे घटना ?

नागपूर शहरालागत वाडी परिसरात अरविंद बारब्दे आणि देवराव हे राहत होते. याच भागातील आंबेडकर नगर मधील निर्मनाधीन इमारतीत अरविंद आणि देवरवची ओळख झाली. दोघेही दारूचे व्यसनाधीन असल्याने घटनेच्या दिवशी (ता.21) अरविंदने देवरावला दारू आणायला 40 रुपये दिले. परत येताना देवरावने स्वतःच्या पैश्याने जेवण आणलं. त्यानंतर दोघांनी मनसोक्त दारू पिली. त्यानंतर, जेवण करताना अरविंदने पूर्ण भात खाऊन घेतला. म्हणून, संतप्त झालेल्या देवरावने जोरदार भांडण करत शिवीगाळ केली. यात अरविंदचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक पोलिसांनी यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पण शवविच्छेदनाच्या अहवालात हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने वाडी पोलीसानी नेमकं काय घडले याचा शोध सुरू केला.

असा घेतला मारेकऱ्याचा शोध

या तपासात त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटोज तपासले, विचारपूस केली पण हातात काही लागले नाही. यादरम्यान, तपासात सीसीटीव्ही मध्ये एक व्यक्ती संशयीत आढळल्याने पोलिसांनी त्याच्या शरीरयष्टीवरून त्याला शोधलं. देवरावला ताब्यात घेत विचारपूस केली असता, देवरावने हत्येचा घटनाक्रम सांगितला. वाडी पोलिसांनी हत्येचा गुन्ह्यात देवरवला अटक केली. भाताचा हिस्सा न दिल्याने हा खून केल्याचे त्याने सांगितले.