आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक छायाचित्रण दिन:एक छायाचित्र काढल्यानंतर बदलावा लागायचा फ्यूज झालेला बल्ब, छायाचित्रकारासोबत राहत असे बल्बची बॅग

नागपूर2 महिन्यांपूर्वीलेखक: अतुल पेठकर
  • कॉपी लिंक
  • लाकडी पेटीच्या कॅमेऱ्यापासून आजच्या अत्याधुनिक कॅमेऱ्याने माणसाचे जीवन समृद्ध केले

छायाप्रकाशाची योजना करून काढलेली कृष्णधवल छायाचित्रे माणसाला नाॅल्स्टेजिक करतात. कॅमेऱ्याच्या शोधामुळे माणसाच्या मूळच्या सौंदर्यात अधिकच भर पडली. आज मोबाइलमुळे छायाचित्र घेणे खूपच सोपे झालेले असले तरी एकेकाळी छायाचित्र काढणे हा सोहळा असायचा. नागपुरातील किशोर दिवेकर आणि भार्गव जोगळेकर यांच्या कॅमेरा संग्रहालयातील कॅमेऱ्यांवरून हा इतिहास अलगद पुढ्यात उतरतो…

लाकडी पेटीच्या कॅमेऱ्यापासून आजच्या अत्याधुनिक कॅमेऱ्यापर्यत कॅमेऱ्याने माणसाचे जीवन समृद्ध केले आहे. एकेकाळी बल्बवाला कॅमेऱ्याची क्रेझ होती. एक फोटो काढला की कॅमेऱ्यातील बल्ब फ्यूज होत असे. त्यानंतर दुसऱ्या फोटोसाठी बल्ब बदलावा लागत असे. त्यासाठी फोटोग्राफरला लंबुळक्या बल्बची एक स्वतंत्र बॅगच सोबत बाळगावी लागायची, असे किशोर दिवेकर यांनी सांगितले. त्यांच्या संग्रहालयात ८० ते ९० कॅमेरे आहेत. ईस्टमन कोडॅक कंपनीने १८८८ मध्ये लाकडी पेटीचा एक कॅमेरा बाजारात आणला. या कॅमेऱ्यातील लाकडी पेटीत २० फूट लांबीची, प्रकाशाचा परिणाम होणारी कागदाची गुंडाळी घालून त्यावर १०० गोलाकार छायाचित्रे घेण्याची सोय होती.

१०० ते १५० वर्षांपूर्वी प्लेट कॅमेरा वापरला जात असे. एकाच वेळी ५० ते १०० जणांचे छायाचित्र एकाच चौकटीत काढण्यासाठी या कॅमेऱ्याचा उपयोग होई. जास लॅनकास्टर्स अँड सन या बर्मिंगहॅम येथील कंपनीच्या या कॅमेऱ्यात प्लेटवर उलटी प्रतिमा येत असे. याला निगेटिव्ह म्हणत. त्यावर प्रक्रिया करून फोटो तयार केला जात असे. याचप्रमाणे कॅलोटाइप कॅमेरा, डागरोटाइप कॅमेरा, कोडॅक कॅमेरा प्रसिद्ध होते.

सर्वप्रथम वापरला फोटोग्राफी शब्द
एक शास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलीय अभ्यासक असलेल्या सर जान हर्शेल यांनी सर्वप्रथम फोटोग्राफी हा वापरला. याशिवाय निगेटिव्ह व पॉझिटिव्ह हे शब्द व्यवहारात रूढ केले. हायपो सोडियम थायोसल्फाइट या क्षाराचा उपयोग फोटो प्रतिमा फिक्स करण्यासाठी करावा, असे सर्वप्रथम सर जाॅन हर्शेल यांनी सुचवले. ते फोटोग्राफीतील शोधकार्यासाठी प्रसिद्ध आहेत.


बातम्या आणखी आहेत...