आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी:जखमी बिबट्याने हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकावर केला हल्ला

नागपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी सकाळी चक्क नागपुरात बिबट्या आला. एका वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या बिबटाने वर्धा रोडवरील श्यूअरटेक हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकावर हाॅस्पीटलमध्येच उपचार सुरू आहे.

घटनांत वाढ

अलिकडे नागपुरात वाघ आणि बिबट येण्याच्या घटनांत वाढ झालेली आहे. हिंगणा, वानाडोंगरी, इसासनी, बुटीबोरी एमआयडीसीत वाघ दिसणे नवीन नाही. दोन दिवसांपूर्वी नागपूरपासून २० किमी दूर असलेल्या बावनथडी येथील शेतात वाघ दिसल्याची घटना घडली होती.

बिबट्याचा शोध सुरू

आज सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्यानंतर बिबट समोरच्या जंगल परिसरात निघून गेला. घटनेची माहिती मिळताच ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या रेस्क्यू टिमने घटनास्थळ गाठून ऑपरेशन बिबट्या सुरू केले आहे. ते किती काळ चालेल हे आताच सांगता येत नाही, असे मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी सांगितले.

वावर नवीन नाही

नागपुरात वाघ आणि बिबट्याचा वावर नवीन नाही. यापूर्वी २४ एप्रिल २०१८ रोजी हिंगणा वनपरिक्षेत्रातील एका शेतात शिकारीसाठी मुक्काम ठोकलेला वाघ दुसऱ्या दिवशी शिकार खालल्यावर निघून गेल्याची घटना घडली होती. शिकारीच्या शोधात भटकत असलेल्या वाघाने मंगळवार २४ एप्रिल रोजी सावंगी-देवळी शिवारात असलेल्या पुरूषोत्तम गोतमारे यांच्या केळीच्या बागेत एका रानडुक्कराची शिकार केली. सकाळी शिकार खाऊन वाघ निघून गेला होता.

हिंगणामध्येही बिबट्या

तसेच, 15 एप्रिल 2018 रोजी हिंगणा वनपरिक्षेत्रातील डिगडोह परिसरातील एका घराच्या बाथरूममध्ये शिरलेल्या बिबट्याची तब्बल आठ तासांच्या थरारक प्रयत्नांनंतर बेशुद्ध करून सुटका करण्यात वनाधिकाऱ्यांच्या चमूला यश आले होते. हिंगणा एमआयडीसी अंतर्गत लता मंगेशकर रूग्णालय परिसर, डिगडोह, वाघदरा ते मिहान असा बराच मोठा चिंचोळ्या आकाराचा जमीनीचा पट्टा आहे. जंगलाला लागून असलेला हा पट्टा शेती होत नसल्याने मोकळाच आहे. तिकडून फिरत फिरत हा बिबट सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास या परिसरात आला व पराग बावस्कर यांच्या घरातील बाथरूममध्ये शिरला.

बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी नागपूर व अमरावती येथून चमू बोलावण्यात आले होते. बाथरूमच्या व्हेंटीलीशनची जाळी काढून बेशुद्ध करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु बिबट्या इंजेक्शन मारणाऱ्यांच्या दिशने तोंड करून असल्यामुळे तसेच प्रसंगी त्यांच्या दिशेने उडी मारीत असल्यामुळे त्याला बेशुद्ध करणे कठीण जात होते. यातच पहिले चार इंजेक्शन बिबट्याने चुकवले. बाथरूमच्या व्हेंटीलेटरमधून पाणी टाकल्यानंतर बिबट्या चमूकडे पाठ करून बसला. त्या नंतर अमरावतीच्या चमूतील अमोल गावनेर यांनी मारलेले इंजेक्शन अचूक लागल्यानंतर बिबट्या बेशुद्ध झाला. बेशुद्ध झालेल्या बिबट्याला सेमीनेरी हिल्स येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आणून पिंजराबंद करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...