आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलगी शरीरसंबंधातून राहिली चार महिन्यांची गर्भवती:विधिसंघर्षग्रस्त मुलाविरूद्ध गुन्हा दाखल

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोबत प्रशिक्षण घेत असताना झालेल्या मैत्रीतून 17 वर्षाच्या मुलाने 17 वर्षीय मुलीशी ठेवलेल्या शारीरिक संबंधातून मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाल्याची प्रकार मुलीने प्रियकराचे नाव सांगितल्यानंतर उघडकीस आला. जरीपटका पोलिस ठाण्यात या प्रकरणी पाॅक्सो कायद्यातंर्गत तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जरीपटक्यात राहणारी 16 वर्षीय मुलगी दहावीची विद्यार्थिनी आहे. ती कराटे क्लासला जात होती. त्याच प्रशिक्षण केंद्रात सराव करणारा 17 वर्षीय आरोपी मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सप्टेबर 2021 मध्ये तिला अंबाझरीतील एका मित्राच्या घरी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर दोघेही वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागले. यादरम्यान ती गर्भवती झाली. अल्पवयीन असलेल्या दोघांनाही गर्भपाताबाबत माहिती नव्हती. मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिच्या आईने रुग्णालयात नेल्यानंतर मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. विचारणा केली असता मुलीने प्रियकराचे नाव सांगितले. जरीपटका पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

ती परत आलीच नाही

दुसऱ्या एका प्रकरणात एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार बेलतरोडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 38 वर्षीय फिर्यादीची 17 वर्षीय मुलगी काॅलेजला जाते असे सांगून घरून निघून गेली. ती परत आली नाही. अल्पवयीन मुली घरून निघून जाण्याच्या घटनांत नागपुरात वाढ होत असून यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही 36 वर्षीय फिर्यादीची 17 वर्षीय मुलगी घरून निघून गेली. ती परत आली नाही.

कारण अस्पष्ट

अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली त्या प्रकरणात संबंधित अल्पवयीन मुलाला अजून चौकशीसाठी बोलावले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी त्याला बोलावून चोकशी करण्यात येणार आहे. नेमका कोणत्या परिस्थितीत प्रकार घडला, त्या मागे नेमके काय कारण आहे हे समजून घेऊन पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल. अशी प्रकरणे संवेदनशीलतेने हाताळावी लागतात.

बातम्या आणखी आहेत...