आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षणार्थी बेपत्ता:गोंदियातील विमान किरणापूर जंगलातील टेकडीवर कोसळले; प्रशिक्षक वैमानिक ठार

गाेंदिया14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळावरील पायलट प्रशिक्षणार्थी विमान टेकडीवर काेसळून झालेल्या अपघातात एक महिला व पुरुष ट्रेनी पायलटचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोसमरा पंचायत अंतर्गत जंगलातील टेकडीवर घडली. प्रशिक्षणार्थी महिला वैमानिकाचे नाव रुपशांका वरसुका आणि प्रशिक्षकाचे नाव मोहित आहे. प्रशिक्षणार्थी रुपशांका बेपत्ता असल्याचे पोलिस अिधक्षक समीर सौरभ यांनी सांगितले.

हेलकावे खात विमान आदळले : मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थी विमान अपघातग्रस्त ठिकाणी अचानक हेलकावे खाऊन टेकडीवर आदळले. त्यामुळे त्यातून ज्वाळा निघू लागल्या आणि काही सेकंदांतच विमान डोंगरावरून खाली कोसळले. त्यानंतर विमानाला आग लागून विमानातील प्रशिक्षक मोहितचा जळून मृत्यू झाला. विमानाचे अवशेष १०० फूट खोल दरीत पडले होते.

बातम्या आणखी आहेत...