आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नायलाॅन मांजाचा बळी:नागपुरात नायलाॅन मांजाने घेतला तिसरा बळी, 20 वर्षीय तरुणाचा गळा कापल्याने मृत्यू

नागपूर3 दिवसांपूर्वीलेखक: अतुल पेठकर
  • कॉपी लिंक
  • नायलॉन मांजाच्या वापरामुळे मागील वर्षी शंभरच्या वर नागरिक जखमी झाले होते

नायलाॅन मांजाने गळा कापून तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूरात घडली आहे. प्रणय ठाकरे (वय २०) हे या तरूणाचे नाव आहे. तो मानेवाड्यातील ज्ञानेश्वर नगर येथे राहत होता. गेल्या १० दिवसांत नायलॉन मांजाने घेतलेला प्रणय हा तिसरा बळी आहे. यापूर्वी वंश तिरपुडे आणि एंटा सोळंकी या दोन मुलांनी नायलॉन मांजामुळे जीव गमावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी प्रणय आपल्या (एमएच ३१, व्हीएस ५२०५) क्रमाकांच्या अॅक्टीव्हावरून जात होता. त्यावेळी दाेघे जण अडकलेला मांजा ओढत होते. यावेळी मांजाने प्रणयचा गळा कापल्या जाऊन तो खाली पडला. लोकांनी त्याला हॉस्पीटलमध्ये भरती करेपर्यंत खूप रक्तस्त्राव झाला होता. हॉस्पी​​​​​​टलमध्ये नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. ही घटना ताजी असतानाच मानेवाड्यात सौरभ पाटणकर (वय २२) याचा मांजामुळे हात कापल्याची घटना समोर आली आहे.

नायलॉन मांजामुळे संक्रांतीच्या काळात पशुपक्ष्यांना हमखास इजा होते. हा मांजा रस्त्यात, झाडावर किंवा इतरत्र अडकल्याने नागरिकांच्या जिवालाही घातक ठरतो. त्यामुळे अनेक नागरिकांना, तसेच पक्ष्यांनाही गंभीर इजा झाल्या आहेत. या मांजामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे मागील वर्षी शंभरच्या वर नागरिक जखमी झाले होते. मात्र, तरीही यातून बोध घेतला जात नसून या मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser