आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चंद्रपूर:डुकराचा पाठलाग करताना राइस मिलमध्ये शिरला वाघ, हल्ल्यात एक मजूर झाला जखमी

चंद्रपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाघ शिरल्याची बातमी गावात पसरताच बघ्यांची झालेली गर्दी
  • वाघ शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच बघ्यांची गर्दी झाली

जिल्ह्यातील सिंदेवाही येथे एक वाघ शिकारीसाठी गावठी डुकराचा पाठलाग करताना राईस मिलमध्ये शिरला. या वाघाने केलेल्या हल्ल्यात एक मजूर जखमी झाल्याने खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने मिलमधील जंगलाचा भाग जाळी लावून सील केला आहे.

सकाळी आठ वाजताच्या सुमारास डुकराची शिकार करण्यासाठी वाघ मिलच्या कम्पाउंडवरून उडी मारून आतमध्ये शिरला. त्याने डुकराला मारले. मिलच्या कम्पाउंडला लागून गोसेखुर्दचा कालवा आहे. त्या बाजूने वाघ आत शिरला. तिथे काम करणारा एक मजूर वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला. दरम्यान वाघ शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच बघ्यांची गर्दी झाली.