आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात:लग्नाच्या वऱ्हाडाला भीषण अपघात; 5 ठार तर वीस वऱ्हाडी गंभीर जखमी

चंद्रपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिकांनी जखमींना सिंदेवाही रुग्णालयात दाखल केले

लग्नासाठी जात असलेल्या वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात 5 वऱ्हाडी ठार झाले असून, 20 जण जखमी झाले आहेत.

रत्नापूर येथे लग्न आटोपून एमएच 31, पीक्यू 3915 क्रमाकांचा मेटॅडोर सिंदेवाही तालुक्यातील एकरा येथे जात होता. गाडीचे टायर फुटल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने मेटॅडोर झाडावर आदळली. धडक इतकी भीषण होती की, मेटॅडोरने पूर्ण पलटी खालली व आतील वऱ्हाडी एकमेकांवर आदळून मरण पावली. अपघातग्रस्तांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढावे लागले. परिसरात सर्वत्र विखुरलेले सामान व रक्ताचा सडा पाहून असे अंगावर काटा आणणारे दृष्य होते.

घटनास्थळापासून जवळच रेल्वे फाटक आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी फाटक ओलांडून जावे लागणार होते. जखमींना वेळेवर नेता यावे म्हणून या मार्गाने जाणाऱ्या मालगाडीला नागरिकांनी काही काळासाठी राेखून धरले व रूग्णवाहिकेला रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी मदत केली.

मृतकांमध्ये साहिल कोराम (वय 14), रघुनाथ कोराम (वय 41), कवीता संजय बोरकर (वय 35), वीणा घनश्याम गहाणे (वय 26) व वैभव लोमेश सहारे (वय 30) यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...