आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:नागपुरातील मेडिट्रिना रूग्णालयात होणार 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीची ट्रायल

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेटा मॉनिटरिंग बोर्डाला द्यावा लागेल दुसऱ्या फेजचा ट्रायल डेटा

नागपूर येथील मेडिट्रिना रूग्णालयात 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील भारत बायोटेकच्या कोवीड-19 लसीची ट्रायल होणार आहे. डॉ. आनंद राठी यांच्या नेतृत्वातील पाच जणांची टिम ही ट्रायल घेणार आहे. मेडिट्रिनाचे सीईओ अर्पण पांडे यांनी याला दुजोरा दिला. यापूर्वी या रूग्णालयाने कोव्हॅक्सिनची ट्रायल घेतली आहे.

मेडिट्रिनासोबत दिल्ली व पाटणा एम्समध्ये या लसीची ट्रायल घेतली जाणार आहे. 2021 च्या जानेवारी महिन्यात एकूण कोरोना केसेसच्या 5 टक्के असलेली लहान मुलांची संख्या एप्रिल मध्ये 11 टक्क्याहून अधिक झालेली दिसते. यावरूनच नजीकच्या काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणावर बाधित होतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेऊन लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी भारत बायोटेकने हा प्रस्ताव दिला होता.

डेटा मॉनिटरिंग बोर्डाला द्यावा लागेल दुसऱ्या फेजचा ट्रायल डेटा

सूत्रांनी सांगितल्यानुसार, एक्सपर्ट्स कमेटीने कंपनीला तिसऱ्या फेजच्या ट्रायलसाठी CDSCO कडून परवानगी घेण्यापूर्वी, डेटा अँड सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड (DSMB) ला दुसऱ्या फेजचा सुरक्षा डेटा देण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी, 24 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत प्रस्तावावर विचार करण्यात आला आणि भारत बायोटेकला रिवाइज्ड क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...