आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • A Truck Collided With A Bike; A Mother Along With A Three month old Baby Girl Were Killed, Three Were Killed In A Horrific Accident In Nagpur District

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक:तीन महिन्यांच्या चिमुकलीसह आई गतप्राण, नागपूर जिल्ह्यात भीषण अपघातांमध्ये तीन ठार

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर ग्रामीणमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये ३ जण ठार झाले. यामध्ये मौदा येथे ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तीन महिन्यांच्या चिमुकलीसह आई ठार झाली. हा अपघात गुरुवारी झाला. या घटनेने संतप्त जमावाने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला शांत केले.

मौदा येथील राष्ट्रीय महामार्गावरील रबडीवाला टी पाॅइंटवर मोटारसायकलस्वार रस्ता आेलांडत असताना भंडाऱ्याकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत तीन महिन्यांची चिमुकली पार्थवीसह तिची आई प्रांजल राजहंस वाघमारे (२२) जागीच ठार झाली, तर मोटारसायकलस्वार राजहंस किसन वाघमारे (२८) व त्याची आई अंजना किसन वाघमारे (४५) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुसऱ्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू एका दुसऱ्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पारडी रोडवरील आपल्या शेतातून घरी परत येत असताना मांढळ-उमरेड मार्गावरील दूध डेअरीजवळ झालेल्या अपघातात स्प्लेंडर दुचाकीचालकाचा घटनास्थळावर जागीच मृत्यू झाला. नामदेव मेश्राम (४७) असे त्यांचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...