आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फाेट:चंद्रपुरात पाण्यामुळे भिजलेला मोबाइल उन्हात सुकवण्यास ठेवला असता स्फाेट

चंद्रपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विठ्ठल मंदिर वार्डातील स्टेडियमजवळ एमआय कंपनीच्या मोबाइलचा स्फोट झाला आहे. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोबाइलच्या स्फोटामुळे दुचाकी वाहनाचे नुकसान झाले. अशोक अंबिरवार यांचा मोबाइल पाण्याने ओला झाला होता. बॅटरी सुद्धा काही प्रमाणात फुगली होती. त्यामुळे अंबिरवार यांनी मोबाइल वाळवण्यासाठी दुचाकीवर बाहेर ठेवला होता. मात्र काही क्षणात मोबाइलचा जोरदार स्फोट झाला. अचानक झालेल्या या स्फोटाच्या आवाजाने विठ्ठल मंदिर परिसर दणाणून गेला.

बातम्या आणखी आहेत...