आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकने चिरडले:दुचाकी अपघातात जखमी झालेल्या महिलेस भरधाव ट्रकने चिरडले

भंडारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा शहरासह जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा शहरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला आलेला महापूर बघून घराकडे परतणाऱ्या महिलेच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेल्या महिलेला भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना भंडारा शहरात मंगळवारला दुपारी घडली.शांता रामभाऊ वावरकर (५०) रा. तकिया वॉर्ड, भंडारा असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे भंडारा शहराला पुराच्या पाण्याने अक्षरशः विळखा घातला आहे. पूरपरिस्थिती बघण्यासाठी भंडारा शहरातील नागरिकांची वैनगंगा नदीवर मोठी वर्दळ वाढली आहे. तकीया वॉर्डातील शांता वावरकर या एम एच ३६ यु ८६१५ या वैनगंगा नदीच्या पुराची परिस्थिती बघण्यासाठी गेल्या होत्या. तिथून घराकडे परतताना उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयासमोरील पेट्रोल पंपजवळ सीजी ०४ एन एच ८६०८ या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.या धडकेत दुचाकीस्वार शांता या राष्ट्रीय महामार्गावर कोसळल्या. नेमक्या याचवेळी राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव गेलेल्या ट्रकच्या चाकाखाली महिला आल्याने त्यांचा घटनास्थळीत चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील, वाहतूक पोलीस हवालदार राजू हाके हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून याप्रकरणी वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चारचाकी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. तर, अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...