आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS च्या अभ्यासिकेत गोळीबार:भंडाऱ्यातल्या घटनेत तरुणाचा मृत्यू; देशी कट्ट्यासह संशयिताला ठोकल्या बेड्या

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भंडाऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यासिकेत झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली.

अतुल वंजारी (28 रा. गणेशपूर ता. भंडारा) असे मृताचे नाव आहे. तर, गंगाधर निखारे (40, रा. पवनी) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय?

भंडारा पोलिस स्टेशन परिसरात हेडगेवार चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इमारत आहे. या इमारतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्यावत असे स्व. अण्णाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालय आणि अद्यावत अभ्यासिका केंद्र आहे. या वाचनालयात अचानकपणे चार वाजता गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून उपस्थितांसह परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. गोळीबारामुळे सर्वत्र धावपळ सुरू झाली. अशात एक तरुण अवस्थेत जखमी झाल्याचे आढळून आले. दरम्यान घटनेनंतर आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तर, गंभीर अतुलला पोलीस आणि नागरिकांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.

कौटुंबिक वादातून कृत्य

अतिरक्तस्त्रावामुळे जखमी अतुलचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक रोहित मतानी, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील, पोलिस निरीक्षक सुभाष बारसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, खासदार सुनील मेंढे यांच्यासह दंगल नियंत्रक पथक व अतिरिक्त पोलिस कुमक संघ कार्यालय परिसरात पोहोचले. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

बातम्या आणखी आहेत...