आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात मुख्याध्यापकाचे अपहरण:अपहरकर्त्यांनी मागितली 30 लाखांची खंडणी, अन्यथा जीवे मारण्याची धमकी

प्रतिनिधी/नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जरीपटका पोलिस ठाणे परिसरात राहणाऱ्या मुख्याध्यापकाचे मानकापूर येथील एका खासगी हाॅस्पिटलसमोरून शुक्रवारी मध्यरात्री अपहरण झाल्याचे समोर आले आहे.

अपहरणकर्त्यांनी मुख्याध्यापकाच्या कुटुंबीयांकडे 30 लाखांची खंडणी मागितली आहे. तसेच, आज म्हणजेच शनिवारपर्यंत हे पैसे तयार ठेवा, अन्यथा मुख्यध्यापकांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दिली आहे. त्यामुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.

​​​​​​​सीसीटीव्ही फुटेज आढळले

जरीपटका परिसरातील महात्मा गांधी शाळेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप मोतीरामानी यांचे अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांना अपहरणाचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे. यात अपहरणकर्त्यांनी मोतीरामानी यांना एका वाहनातून बसवून नेल्याचे दिसत आहे.

जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, वडील घरी न आल्याने मोतीरामानी यांच्या मुलीने वडिलांना केलेला फोन अपहरणकर्त्यांनी उचलला. तेव्हा अपहरणकर्त्यांनी मुलीकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप मोतीरामानी शुक्रवारी रात्री त्यांच्या दुचाकीवर बाहेर पडले. खूप रात्र होऊनही वडील घरी न परतल्याने मुलीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर अपहरणकर्त्यांनी उचलला. शनिवारी दुपारपर्यत ३० लाख तयार ठेवा. नाहीतर वडिलांना जिवंत पाहणार नाही, अशी धमकी दिली.

दुचाकी सापडली

अपहरणकर्त्यांनी फोन केल्यानंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी समाजातील ज्येष्ठांशी चर्चा केली. त्यांनी पोलिस तक्रार करण्यास सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तेव्हा रामानी यांची दुचाकी कामठी रोडवर स्थित एका हाॅस्पिटलसमोर उभी असलेली दिसली. यामुळे पोलिसही बुचकळ्यात पडले आहे. रामानी हाॅस्पिटलमध्ये कशासाठी गेले होते? अपहरणकर्त्यांनी त्यांना तिथे गाडी पार्क करण्यासाठी सांगितले काय ? असे प्रश्न उपस्थित झाले आहे.

शेवटचे लोकेशन

मोतीरामानी यांच्या फोनचे शेवटचे लोकेशन मौदा येथे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांचे एक पथक मौदा येथे रवाना झाले आहे. या शिवाय मध्य प्रदेश व छत्तीसगढ पोलिसांनाही कळवण्यात आले आहे. मोतीरामानी यांचे अपहरण का करण्यात आले? कोणी केले? अशा प्रश्नांचा शोध पोलिस घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...