आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातुन हाकलपट्टी करावी आणि अब्दुल सत्तार यांनी तात्काळ खासदार सुप्रिया सुळे यांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र राज्यात मंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्र राज्यात फिरू देणार नाही अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी आज केली.
हाकालपट्टी करा
सचिन खरात म्हणाले, आम्ही अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहे. मंत्रिमंडळातून मंत्री अब्दुल सत्तार यांची हाकालपट्टी करावी अशी आमची मुख्यमंत्री शिंदे यांना मागणी आहे, अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.
सत्तारांचे वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र राज्य जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, रमाई, अहिल्याबाई यांचे राज्य आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यापासून अब्दुल सत्तार वादग्रस्त वक्तव्य करत आहे आता त्यांनी आता माफी मागावी.
अब्दुल सत्तारांना इशारा
मंत्री सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकिचे वक्तव्य केले आहे. हे म्हणजे मनूस्मृतीच्या विचारावर चालणे होय. राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही मागणी करतो की, तत्काळ अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातुन हाकलपट्टी करावी आणि अब्दुल सत्तार यांनी तात्काळ खासदार सुप्रिया सुळे यांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र राज्यात मंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्र राज्यात फिरू देणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.