आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नांदगावजवळ बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दहिसर-मुंबईचे दोन जण ठार झाले. कार क्रमांक एमएच ४७ बीबी ६५७४ चा पुढचा टायर फुटल्याने हा अपघात झाला.
अतुल तावडे व राजू शिंदे अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे असून दोघेही ४५ ते ५० वयोगटातील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघांसह प्रवेश पाटील व बाळकृष्ण धमाले हे दोघे गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालकासह एकूण पाच जण या वाहनात होते. हे वाहन मुंबईहून नागपूरकडे जात होते. दरम्यान सायंकाळी सात, साडेसातच्या सुमारास समृद्धी महामार्गावर या वाहनाच्या समोरचा टायर फुटला. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन उलटले. यात चौघेही जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.