आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना यश:घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

गोंदिया22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमगाव पोलिस ठाणेअंतर्गतच्या नारायणनगर येथील प्रशांत असाटी यांच्या घरी झालेल्या घरफोडी प्रकरणातील आरोपींचा शोध गोंदियाच्या श्वानपथक व श्वान जॅकच्या माध्यमातून लावण्यात पोलिसांना यश आले.आमगाव पाेलिसांत प्रशांत असाटी रा. नारायणनगर यांच्या घरी चाेरी झाल्याबाबत कळवल्याने श्वान पथकचे पीएसआय कुळमेथे टीम व श्वान जॅकसह घटनास्थळी पाेहाेचले.

घटनास्थळी पोनि हांडे यांना भेटून घटनास्थळाची पाहणी केली असता, घटनास्थळी भगवा गमछा व ग्लोव्हज दिसून आले. या वस्तूंचा श्वान जॅकला वास देण्यात आला. जॅक गोंदिया रोडवर आला व रोडच्या बाजूला असलेल्या निळ्या रंगाच्या लोखंडी पाण्याच्या टपरीमागे अंधारात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अनाेळखी व्यक्तीजवळ जाऊन भुंकू लागला. त्या व्यक्तीची पाहणी केली असता त्याच्या डाव्या पायाला मोठी जखम व रक्त निघत असल्याचे दिसून आले. त्याला तपासी अधिकारी पो. नि. हांडे व कर्मचाऱ्यांनी औषधोपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेऊन औषधोपचार केले. ताे शुद्धीवर आल्यावर त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव राजेश सुखलाल विश्वकर्मा वय २४ रा. भाजिडोगरी ता. सालेवरा जि. खैरागड (छ. ग.) असे सांगितले. प्रशांत असाटी रा. नारायण नगर आमगाव येथे झालेल्या चोरीबाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी स्वतः चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. पुढील कारवाई हांडे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...