आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीला कारावास:अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कारावास, लाखांदूर तालुक्यातील घटना, जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्वाळा

भंडारा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराच्या ओसरीत जेवण करणाऱ्या अल्पवयीन मुलीला बघून गावातील तरुण गेला. आणि एकटीच असल्याची संधी साधून बळजबरीने अत्याचार केला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील विरली येथे घडली होती. याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी आरोपीस सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली. रमेश रघुनाथ येटरे (३०) रा. विरली असे आरोपीचे नाव आहे.

यातील पीडितेला वडील नसून आरोपीचे पीडित मुलीच्या घरी नेहमी जाणेयेणे होते. आरोपी हा पीडितेच्या आईला नात्याने आजी म्हणत होता. ३ सप्टेंबर २०१७ ला पीडितेची आई शेतावर गेली होती. दुपारी १ वाजताच्या सुमारास मुलगी जेवण करीत असताना आरोपी तिच्या घरी गेला. त्यानंतर तिला जबरदस्तीने ओढत घरात नेत तिच्यावर बळजबरी केली. सायंकाळी शेतावरून घरी परतलेल्या आईला घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर आईसोबत लाखांदूर पोलिस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी तिक्कस यांनी चौकशीचे आदेश देत आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिस उपनिरीक्षक टी. बी. निंबेकर यांनी तपास करून आरोपीला अटक केली. याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी सर्व बाजू व सक्षपुरावे तपासले. यात आरोपीने अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले. यावरून आरोपीला कलम ३७६ (अ)(ब) भादंवी मध्ये १० वर्षाचा सश्रम कारावास व पाच हजार रुपयांच्या द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास दोन महिन्याचा साधा कारावास तसेच कलम ४५२ भादंवी मध्ये पाच वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...