आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मोहफुलाच्या हातभट्टीवर कारवाई; 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

भंडारा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैनगंगा नदीच्या बेटावर असलेल्या मोहफुलांच्या हताभट्टीवर कारधा पोलिसांनी धडक कारवाई केली. यात हातभट्टीवर तयार होणारी दारु आणि त्यासाठी वापरण्यात येणारे कच्च्या साहित्याची नासाडी केली. यावेळी पोलिसांनी ११ लाख १८ हजार ७०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

तिड्डी, सिल्ली, मकरधोकळा, सिरसघाट येथील काही नागरिकांचे हताभट्टिवर मोहफुलाची दारू गाळप करून विक्री करण्याचा अवैध व्यवसाय आहे. ही हातभट्टी वैनगंगा नदीच्या जंगलव्याप्त परिसरातील बेटावर असल्याने तिथे कोणी पोहचू शकत नव्हते. याची माहिती मिळताच पोलिस पथक तेथे बोटीने पोहोचले व कारवाई केली. याप्रकरणी आकाश मेश्राम (३५), रुपेश शेंडे (३४), रवि मेश्राम (३८), अशोक जगनाडे (५०), गणेश मारोती जगनाडे (३६), सुरेन्द्र कळंबे (३८), रमन शालीक भुरे (३०), स्वप्निल कान्हेकर (३०) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी नदीकाठालगत शेतशिवारात मोहफुलाची हातभट्टी गाळण्यासाठी सडवा मोहापास, प्लॉस्टिक व लोखंडी ड्रम, जळाऊ काड्या असा वापरण्यात आलेला ११ लाख १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...