आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका हद्दीत बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य असून, त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय अनामत रक्कम आकारण्यात येते. मात्र, शहरातील ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले परंतु अजूनही रेनवॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था केल्याचे पुरावे सादर केलेले नाही, अशा १२ बांधकामधारकांची अनामत रक्कम मनपाने जप्त केली आहे.
चंद्रपूर शहरात पाण्याची पातळी वाढवण्याच्या दृष्टीने मनपामार्फत रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम हाती घेण्यात आला. रेनवॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ता धारकांना मनपाकडून घराच्या छताच्या आकारमानानुसार ५ हजार, ७ हजार, १० हजार असे वाढीव अनुदान तथा पुढील ३ वर्षापर्यंत मालमत्ता करात २ टक्के सूट देण्यात येत आहे. आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केली असून, परवानाधारक बांधकामदारांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी यापूर्वी १५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता, मात्र त्यांनी या कालावधीत रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्याचे पुरावे सादर न केल्याने भानापेठ प्रभाग येथील ४, तुकुम येथील ३, छत्रपती नगर येथील २, जटपुरा गेट येथील १, रामनगर येथील २ अशा एकुण १२ बांधकाम परवानगीधारकांची अनामत रक्कम जप्तीची कारवाई केली आहे. विहीर, बोअरवेल धारकांनाही रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.