आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Aditya Thackeray Saturday Nagpur Dahi Handi Program Shivsena | The Attention Of The Whole State To What Message Will Be Given To The Shiv Sainiks

आदित्य ठाकरे शनिवारी नागपुरात फोडणार दहीहंडी:शिवसैनिकांना काय संदेश देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे प्रथमच संघभूमी नागपुरात येत आहेत. त्यांच्या दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे येथील शिवसैनिकांना काय सांगतात याविषयी औत्सुक्य आहे. आदित्य ठाकरे शनिवार 27 रोजी नागपुरात येत असल्याची माहिती शहर प्रमुख दीपक कापसे यांनी बुधवारी दिली.

शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. या सत्तांतराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याचे चित्र भाजपकडून निर्माण केले जात आहे. नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतर्फे 27 ऑगस्टला तान्हा पोळानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ठाकरे सहभागी होणार आहेत.

शिवसैनिकांना मानसिक बळ

शिवसेनेचे शहरप्रमुख दीपक कापसे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया उपस्थिती राहणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल शिंदे यांच्यासह काही आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. रामटेकचेच अपक्ष आमदार व पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आशीष जयस्वाल हे सुरुवातीपासूनच शिंदेसोबत आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांना मानसिक बळ देण्यासोबतच पक्षात नव्याने प्राण फुंकण्यासाठी ठाकरे काय संदेश देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नागपूरातील शिवेसेनेतील गटबाजी

या शिवाय नागपूरातील शिवसेनेतील गटबाजी हाही कळीचा विषय आहे. अधूनमधून ही गटबाजी उफाळून येत राहते. प्रत्येक जण वेगवेगळे कार्यक्रम करतो. एकसंघपणे सर्वजण एकत्र आल्याचे दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे शिवसैनिकांना काेणता सल्ला देतात हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...