आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाची दहशत:चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापाठोपाठ आता गोंदियातील नवेझरीत वाघाची दहशत

नागपूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापाठोपाठ आता गोंदिया जिल्ह्यातही वाघाची दहशत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ४० च्या वर वाघ आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात १०० च्यावर वाघ आहेत. गोंदिया जिल्ह्यातही वाघांचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वाघाचा शोध घेऊन त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाचे गस्ती पथक गावात दाखल झाले आहे. जंगलात वा शेतात जायचे असल्यास आधी वन विभागाला कळवावे. एकट्या दुकट्याने जंगलात जाऊ नये असे आवाहन वन विभागाने केले आहे. तिरोडा तालुक्यातील जंगलव्याप्त नवेझरी गावात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावाला लागून व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे तेथील वन्यजीवांचा नेहमीच गावाच्या आजूबाजूला वावर असतो. गेल्या काही दिवसांपासून शेतशिवारात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असून अनेकांना वाघ दिसल्याचे लोक सांगत आहे. सध्या सर्वत्र शेतीची कामे सुरू असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाचे पथक गावात दाखल झाले असून गस्त वाढवण्यात आली आहे. वाघाच्या दहशतीमुळे सायंकाळ होताच परिसरात शुकशुकाट दिसून येतो.

बातम्या आणखी आहेत...