आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:खून करून मृतदेह गादीत गुंडाळून पाइपात ठेवला

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनेगाव परिसरात खून करून मृतदेह जयताळा परिसरातील नाल्याच्या काठावरील एका पाइपमध्ये लपवून ठेवला. या घटनेने खळबळ माजली आहे. भोजराज रामेश्वर डोमडे (वय ३०) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी ठेकेदारासह त्याच्या एका साथीदाराची पोलिस कसून चौकशी केली. मंगळवारीही चौकशी सुरू होती.

घटनेच्या दिवशी रात्री भाेजराज पत्नी ममताला आपण ठेकेदाराच्या घरी जाऊन कामाचे पैसे घेऊन येतो असे सांगून बाहेर पडला. परंतु बराच वेळ होऊनही तो घरी परत आला नाही. त्याचा फोन बंद येत असल्याने अखेर सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल करून घेतली.

दरम्यान २९ रोजी जयताळा परिसरातील एका नाल्याच्या काठावरील पाइपमध्ये गादीत गुंडाळलेला मृतदेह आढळून आढळून आला. बेपत्ता भोजराजचा चाकूने भोसकून खून झाला. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी ७ वाजता जयताळा बाजार परिसरात आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी नाल्यात एका युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती प्रतापनगर पोलिसांना मिळाली. मृतदेहाची ओळख पटल्यावर तो भोजराम डोमडे असून तो सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती मिळाली. तान्हा पोळ्याच्या रात्री दहा वाजता भोजराजचे अज्ञात आरोपीने अपहरण केले. त्याचा सोनेगावाच्या हद्दीत चाकूने भोसकून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जयताळा बाजारातील नाल्याच्या काठावरील पाईपात मृतदेह लपवून ठेवला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सोनेगाव पोलिसांचा हलगर्जीपणा सोनेगाव पोलीस ठाण्यात भोजराजची पत्नी ममता हिने पती बेपत्ता झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी भोजराजच्या शोधासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप केला जात आहे. जर पोलिसांनी त्वरित हालचाल केली असती तर त्याचा जीव वाचला असता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा जीव गेल्याचादेखील आरोप होत आहे.

बातम्या आणखी आहेत...