आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून करून मृतदेह गादीत गुंडाळला:पाईपमध्ये ठेवून खूनी पसार, संशयितांची कसून चौकशी; पोलिसांचा हलगर्जीपणा समोर

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनेगाव परिसरात खून करून मृतदेह जयताळा परिसरातील नाल्याच्या काठावरील एका पाईपमध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. भोजराज रामेश्वर डोमडे (वय 30) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी ठेकेदारासह त्यांच्या एका साथीदाराची पोलिसांनी कसून चौकशी केली. याप्रकरणी मंगळवारीही चौकशी सुरू होती.

घटनेच्या दिवशी रात्री भाेजराज पत्नी ममताला आपण ठेकेदाराच्या घरी जाऊन कामाचे पैसे घेऊन येतो असे सांगून बाहेर पडला. परंतु बराच वेळ होऊनही तो घरी परत आला नाही. त्यांचा फोन बंद येत असल्याने अखेर सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल करून घेतली.

जयताळा बाजार परिसरात आढळला

दरम्यान 29 ऑगस्ट रोजी जयताळा परिसरातील एका नाल्याच्या काठावरील पाईपमध्ये गादीत गुंडाळलेला आढळून आला. बेपत्ता भोजराजचा चाकूने भोसकून खून झाला. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी 7 वाजता जयताळा बाजार परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

अपहरण करुन खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी नाल्यात एका युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती प्रतापनगर पोलिसांना मिळाली. मृतदेहाची ओळख पटल्यावर तो भोजराम डोमडे असून तो सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती मिळाली. तान्हा पोळ्याच्या रात्री दहा वाजता भोजराजचे अज्ञात आरोपीने अपहरण केले. त्याचा सोनेगावाच्या हद्दीत चाकूने भोसकून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जयताळा बाजारातील नाल्याच्या काठावरील पाईपात मृतदेह लपवून ठेवला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सोनेगाव पोलिसांचा हलगर्जीपणा

सोनेगाव पोलीस ठाण्यात भोजराजची पत्नी ममता हिने पती बेपत्ता झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी भोजराजच्या शोधासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप केला जात आहे. जर पोलिसांनी त्वरित हालचाल केली असती तर त्याचा जीव वाचला असता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा जीव गेल्याची देखील चर्चा परिसरात आहे. सोनेगाव पोलिसांचा हलगर्जीपणा याआधीही समोर आलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...