आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:ओव्हरटेक केल्यानंतर कार उभ्या ट्रकला धडकली; 7 ठार, 1 जखमी, अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात

नागपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरेड मार्गावरील उमरगाव फाट्याजवळ भरधाव कार ट्रकला धडकून झालेल्या भीषण अपघातात ७ ठार, तर एक जण जखमी झाला. मृतांमध्ये एका महिलेसह ६ पुरुषांचा समावेश आहे. हा अपघात शुक्रवार, ६ मे रोजी रात्री झाला. कारमध्ये बसून नागपुरातील प्रवासी उमरेडमार्गे नागपूरला येत होते. सागर शेंडे हा गाडी चालवत होता. रात्रीची वेळ असल्याने चालकाने गाडीचा वेग वाढवला होता. या गाडीसमाेर एक ट्रकही धावत होता. भरधाव कारने ट्रकला ओव्हरटेक केले.

या वेळी रस्त्याच्या कडेला ट्रक उभा होता. ट्रकला ओव्हरटेक केल्यानंतर कार ट्रकला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला. मृतांमध्ये आश्विन देविदास गेडाम (३३), गाडी चालक सागर संपत शेंडे, स्नेहा आशिष भुजाडे (३०), आशिष विजय भुजाडे (३३), नरेश बाजीराव डोंगरे (४९), मेघनाथ पांडुरंग पाटील (६३), पद्माकर नथ्थूजी भालेराव (वय ५०) यांचा समावेश आहे. आशिषचे परिसरात रेशन धान्य विक्रीचे दुकान, तर नरेश डोंगरे यांचा कॅटर्सचा व्यवसाय होता. यात एक मुलगी बचावली. रस्त्याने जाणाऱ्यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर उमरेड व कुही पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...