आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:मुख्यमंत्र्यांनंतर थोरातांनीही केले तुकाराम मुंढेंचे समर्थन, सरकार म्हणून पाठीशी असल्याचे सांगितले

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मुख्यमंत्री आणि इतरांमध्ये संवाद नाही, या आरोपात तथ्य नाही'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे समर्थन केले आहे “आम्ही सरकार म्हणून तुकाराम मुंढे आणि संपूर्ण प्रशासनाच्या पाठीशी उभे आहोत,’ असे बाळासाहेब थोरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोराेनाचा प्रादुर्भाव वाढत असताना काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यात संघर्ष झडला होता. संदीप जोशी यांनी मुंढेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या संघर्षाची राज्यभर चर्चा झाली. मात्र, या संघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांचे समर्थन केले होते. त्यापाठोपाठ बाळासाहेब थोरात यांनीही सरकार म्हणून तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.

‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना थाेरात म्हणाले, विनायक मेटे मराठा आरक्षणावरून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. मराठा आरक्षणाबाबत विनायक मेटे यांनी केलेले आरोप निराधार असून मेटे सध्या विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत.

उद्धव ठाकरेंचा सर्वांशी उत्तम संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहजतेने बोलतात. समोरच्याला संवाद साधत समजून घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. सरकारमधील मंत्रीच नव्हे तर आमदारांशी ते सातत्याने बोलत असतात. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशीही ते नेमाने संवाद साधतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि इतरांमध्ये संवाद नाही, या आरोपात तथ्य नाही, असे थाेरात म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...