आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी करण्यात आली. दोन्हीही जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. नागपुरात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. या विजयानंतर आता चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांना खोचक टोला लगावला आहे. आज झालेला आपला विजय हा नाना पटोले यांचा पराभव आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून घोडेबाजार करण्यात आला असल्याचा आरोप देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.
काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज
विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बानकुळेंनी आपल्या भाजप या पक्षाचे आभार मानले आहे. ते म्हणाले की, मला पक्षाने उमेदवारी दिल्या बद्दल मी पक्षाचे आभार मानतो. ज्या कामासाठी मला उमेदवारी देण्यात आली आहे त्या सर्व अपेक्षा मी पूर्ण करेल. काँग्रेसचे नियोजन नव्हते. नाना पटोले आणि त्यांच्या काही नेत्यांच्या हुकूमशाही धोरणामुळे काँग्रेसच्या मतदारांमध्ये नाराजी होती. यामुळे काँग्रेसला खिंडार पडले. काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे देखील बानकुळे म्हणाले आहेत.
काँग्रेसने घोडेबाजार केल्याचा आरोप
विजयानंतर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बानकुळे यांनी नाना पटोलेंवर सडकून टीका केली आहे. तसेच काँग्रेसवर निवडणुकीत घोडेबाजार केल्याचा आरोप देखील केला आहे. बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, आपण आज मिळवलेला विजय हा नाना पटोले यांचा पराभव आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने घोडेबाजार केला होता. मला 362 मते मिळाली. यामध्ये 44 मते जास्त पडली. मी सर्वांचे आभार मानतो.
काँग्रेसच्या छोटू भोयर यांचा पराभव
विधान परिषदेच्या या दोन्ही जागांवर 10 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज या निवडणुकांची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये दोन्हीही जागांवर भाजपने बाजी मारली आहे. नागपूरच्या जागेवर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. तर आघाडीने भाजपचे माजी नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट दिले होते. मात्र भाजपचा नगरसेवक फोडूनही काँग्रेसला यश मिळू शकलेले नाही. येथे चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.