आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघिणी निसर्गमुक्त:शिकारीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अखेर अवनी वाघिणीचा बछडा निसर्गमुक्त, अवनीला वन विभागाच्या आदेशाने केले होते ठार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वनविभागाच्या आदेशानुसार अवनी टी-१ या वाघिणीला शिकाऱ्याकडून ठार मारण्यात आले होते

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नजीकच्या जंगलात तीन वर्षांपूर्वी गाजलेल्या अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणानंतर आता "अवनी'च्या पूर्ण वाढ झालेल्या बछड्याला (मादी शावक) पेंच व्याघ्र प्रकल्पात मुक्त पणे संचार करण्यास सोडण्यात आले आहे. अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर तीच्या बछड्याला म्हणजेच मादी शावकाला पेंच व्याघ्र प्रकल्पात ठेवण्यात आले होते. वनविभागाच्या आदेशानुसार अवनी टी-१ या वाघिणीला शिकाऱ्याकडून ठार मारण्यात आले होते.

अवनीने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आणि राळेगाव तालुक्यातील १३ व्यक्तींवर हल्ला करून ठार मारल्यामुळे हा निर्णय वन विभागाने घेतला होता. अवनीच्या मृत्यूनंतर तिच्या बछड्यांचा प्रश्न पुढे आला होता. त्यानंतर अवनीचा बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने अनेक प्रयत्न केले. त्यावेळी, मात्र तीन वर्षांपूर्वी एका बछड्याला (मादी शावक) पकडण्यात यश आले होते.

तब्बल तीन वर्षांनंतर अवनीचा हा बछडा मुक्तपणे जंगलात संचार करणार असल्याने वन्यजीव प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. अवनी वाघिणीच्या बछड्याला पेंच व्याघ्र प्रकल्पात मुक्त करण्यात आले आहे. आईपासून वेगळे झालेल्या या बछड्याला मागील दोन वर्षांपासून प्रशिक्षण देण्यात येत होते. अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर या शावकाला २२ डिसेंबर २०१८ रोजी पेंचमधील तितरालमांगी येथील सुमारे पाच हेक्टर बंदिस्त क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी आणले गेले.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांनुसार या बछड्याला प्रशिक्षण देण्यात येत होते. हा बछडा तीन वर्ष वयाचा झाला आहे. त्यामुळे पूर्ण वाढ झालेल्या या वाघिणीला निसर्गमुक्त करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने मान्यता दिल्यानंतर तिला रेडिओ कॉलर बसविण्यात आले होते. राज्याच्या वन्यजीव विभागाच्या प्रमुखांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे तिच्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. या वाघिणीच्या अधिवासाचा दरवाजा उघडण्यात आला आणि तिला पेंचच्या जंगलात मुक्त करण्यात आले. तीन वर्षे आणि दोन महिने वय असलेली ही वाघिण पीटीआरएफ-८४ या नावाने ओळखली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...