आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव:पशुसंवर्धनमंत्र्यांच्या आदेशाला खो; भंडाऱ्यात भरला पशुधनाचा बाजार

भंडारा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचानकपणे गोधनावर लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अनेक गोधन मरणासन्न अवस्थेत पोहोचले आहे. हा चर्मरोग अवघ्या राज्यातील गोधनाला आपल्या विळख्यात घेण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या लम्पी चर्मरोगामुळे पशुपालक मोठ्या चिंतेत आणि आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. याचा गैरफायदा उचलत पशुपालक तथा शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याची गंभीर बाब राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तक्रारीच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. त्यामुळे राज्यातील कुठल्याही पशुधन मालकाला व शेतकऱ्यांना आर्थिक विवंचना निर्माण होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांनी तातडीच्या उपाययोजना पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जनावरांवर लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव राज्यात पशुधनावर लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यातील पशुधनांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात यावे, गोधनाचा बाजार पूर्णपणे बंद करून त्यांची होणारी वाहतूक बंद करावी असे निर्देश राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. मात्र, त्यांच्या आदेशाला न जुमानता भंडारा येथे रविवारला सर्रास गोधनाचा बाजार मोठ्या प्रमाणात भरवण्यात आला.

कुठल्या एका जिल्ह्यातीलच नव्हे तर अवघ्या राज्यातील पशुधनाचे लसीकरण व्हावे आणि ते १०० टक्के साध्य व्हावे, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिले आहेत. अहमदनगर येथे पार पडलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी राज्यात करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जनावरांची होणारी वाहतूक आणि प्रत्येक जिल्ह्यात तथा तालुकास्तरावर भरविण्यात येणारा पशुधनाचा बाजार यावर विखे पाटील यांनी बंदी आणली आहे. मात्र, पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांनी बजावलेल्या आदेशाचे भंडारा जिल्ह्यात अक्षरश: पायमल्ली झाल्याचे चित्र रविवारला भंडारा येथे बघायला मिळाले. भंडारा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भरविण्यात येणारा पशुधन बाजार मोठ्या प्रमाणात भरला.

जिल्हाधिकारी, एसपी कार्यालयासमोरून वाहतूक ः भंडारा शहर हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. या महामार्गावर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कार्यालय आजूबाजूला आहे. या दोन्ही कार्यालयासमोरून वाहनांमध्ये कोंबून जनावरांची वाहतूक करण्यात येते.

तलावाच्या पाण्यात बुडून१४ वर्षीय मुलाचा मृत्यू प्रतिनिधी | भंडारा शाळेला सुटी असल्याने गाव तलावात सकाळी आंघोळीसाठी गेलेल्या एका बालकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना पवनी तालुक्यातील चकारा येथे रविवारी घडली.

भारत ओमप्रकाश पाठक (१४) रा. चकारा असे मृतक बालकाचे नाव आहे. पवनी तालुक्यातील अड्याळ येथील विवेकानंद हायस्कूलमध्ये मृतक भारत इयत्ता नववी शिक्षण घेत होता. मृतक भारतच्या वडिलांचे तीन वर्षापूर्वी पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याला आई आणि एक बहीण आहे. आई आणि बहिण या दोघी नागपूरला गेल्याने भारत घरी एकटाच होता. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तो चकारा गावालगत असलेल्या गाव तलावावर पोहणे आणि आंघोळ करण्यासाठी गेला होता. मात्र, बराच वेळ होऊनही भारत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची गावात चौकशी केली. त्यानंतर त्यांनी गाव तलावाकडे धाव घेतली असता तलावाच्या पाळीवर त्याची सायकल आणि कपडे आढळून आले. त्यामुळे तो तलावात बुडाला असावा, असा संशय व्यक्त करून घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. स्थानिक मच्छीमार बांधवांच्या माध्यमातून भारतचा तलावात शोध घेतला असता दुपारी १.५० वाजता त्याचा मृतदेह सापडला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी मर्ग दाखल केला असून अधिक तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे

बातम्या आणखी आहेत...