आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायशोधरा नगर, परवेज नगर, विटा भट्टी परिसरातील एका उदबत्ती कारखान्याला आज 12.30 वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आहे.
आगीचे कारण अस्पष्ट
आगीचे नेमके कारण कळू शकले नसून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनदलाचे 5 बंब, 3 वॉटर ब्राउझर व 5 पाण्याचे टँकर सुरू आहे. तळमजला अधिक एक मजली टिन शेड रचना आहे. अगरबत्ती (उदबत्ती) तयार करण्यासाठी ठेवलेला कच्चा माल यात जळून खाक झाला.
यापूर्वीही अशीच आगीची घटना
यापूर्वी 30 मे रोजी नागपूर-भंडारा रोडवर स्थित नाका नं. 5, कापसी महालगाव येथे असलेल्या दोन आरामशिनला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले होते.
उन्हाळ्यात आगीच्या घटनांत मोठी वाढ होते. आम्ही वारंवार सर्व संबंधितांना सुरक्षेचे उपाय योजण्याच्या सूचना देतो. प्रात्यक्षिकांद्वारे धोके समजावून सांगतो. पण, वारंवार सांगूनही कोणी लक्ष देत नाही. यापुढे सांगूनही उपाय न योजणाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव आहे, असे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.