आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण कोरोनाची काय खबरदारी घेतलीय? कोरोनाची गोष्ट गांभीर्याने घ्या. महाराष्ट्राने, देशाने, जगाने खूप मोठी किंमत मोजली आहे. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागलाय. बेड मिळत नसल्याने कारमध्ये उपचार सुरू आहेत, याकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले.
अजित पवार म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र राज्यासह सर्व देशात आणि जगात कोविड १९ च्या विषाणूने थैमान माजवले होते. त्यावर अनेक प्रकारच्या उपाययोजना करून संपूर्ण जगाने कोविडची साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजूनही काही प्रमाणात कोविडचे पेशंट सापडत आहेत. उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारच्या लक्षात आणून द्यायचे आहे. आता अमेरिका आणि चीनमध्ये हे प्रमाण इतके वाढले की, त्यांना लॉकडाऊन करावे लागला आहे.
चीनमध्ये परिस्थिती गंभीर
आपल्या इथे त्या काळात मार्चमध्ये पहिला पेशंट आला. दुबईतून एक जोडपे आले. ते गाडीत बसले आणि ड्रायव्हरला कोरोना झाला. तिथून ती संख्या वाढत गेली. आता चीन असेल, जपान असेल कोरिया, ब्राझिल या देशात नवीन व्हेरिएंट सापडतोय. कोविडची साथ परत सुरू झालीय. आता चीनमध्ये बेड मिळत नाही म्हणून कारसारख्या वाहनामध्ये पेशंट अॅडमिट करतायत.
काळजी घेण्याचे आवाहन
अजित पवार पुढे म्हणाले की, केंद्र सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी २० डिसेंबर २०२२ ला म्हणजे कालच नव्या व्हेरिएंटची तपासणी आणि काळजी घेण्याचे आवाहन सर्व राज्यांना केले आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता, चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स, हाय पॉवर समिती असे जगभरात काय-काय केले जातेय. त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण काही समिती नेमणार आहोत काय? एकंदरीत कोविडच्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून आपण सगळेजण पक्ष बाजूला ठेवून एकत्र येऊन विशेष काळजी घेण्याची आवश्यकताय.
अनुभव आहेच, पण...
कुठली यंत्रणा तात्काळ उभी करायची याचा अनुभव त्यावेळचे सरकार आणि प्रशासनाला आहेच. आपण त्या काळात विरोधी पक्षात होतात. तरीही सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कोरोनाला रोखण्याचे प्रयत्न केले. हा विषय तातडीचा वाटतोय. हे वाढले, तर विमाने बंद करावी लागतात. काही दिवस लॉकडाऊन केला होता. याचा विसर सभागृहातल्या कोणीही पडू देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
कमिटी गठीत करणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी अजिद पवारांच्या प्रश्नाला उत्तर दिले. ते म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. या संदर्भात केंद्र सरकारशी समन्वय करण्यात येईल. आपण सुचवल्याप्रमाणे एखादी कमिटी किंवा टास्क फोर्स हा, या ठिकाणी तात्काळ गठीत करू. जो बदलत्या परिस्थितीवर नजर ठेवून आपल्याला वेळेवेळी सूचना करेल. त्या सूचनांची अंमलबजावणी आपण निश्चितपणे करू, असे आश्वासन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.