आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:69 गावांतील महिला देवेंद्र फडणवीसांना पाजणार खारे पाणी, पाणी प्या आणि अंघोळही करा; नितीन देशमुखांचे आव्हान

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील 69 गावांतील महिला आपापल्या गावातील पाणी एका ठिकाणी जमा करणार आहे. आणि हे पाणी लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नेण्यात येईल. बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या पुढाकारातून महिला हे अनोखे आंदोलन करणार आहेत. देवेंद्र फडणवीस निश्चित पाणी पितील आणि अंघोळही करतील, असा विश्वास नितीन देशमुख यांनी व्यक्त केला.

अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भाग हा खारपान पट्टा आहे. त्यामुळे नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून खारे पाणी प्यावे लागत आहे. खाऱ्या पाण्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आजार पसरलेले आहेत. लहान मुलांनाही हेच पाणी पाजावे लागत असल्याने लहान बालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी 69 खेड्यांसाठी पदयात्रा सुरु केली आहे. ही पदयात्रा अकोल्याहून अमरावती आणि त्यानंतर नागपूरपर्यंत जाणार आहे. 10 एप्रिल पासून अकोल्यातून ही यात्रा सुरु झाली आहे. 21 एप्रिलला ही पदयात्रा नागपूर येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी पोहचणार आहे.

टँकरमध्ये जमा केले पाणी

नागपूरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी 69 गावातील महिलांनी जमा केलेले पाणी त्यांना देण्यात येईल. हे पाणी फडणवीसांना प्यायला देणार आहेत. जेणेकरुन या गावकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आमदार नितीन देशमुख यांच्या आंदोलकांचा ताफा या सर्व गावांतून फिरत एका टँकरमध्ये हे पाणी घेऊन जात आहेत.

देशमुखांचे आव्हान

नितीन देशमुख या पदयात्रेविषयी म्हणाले, हा बाळापूरमधलाच नाही तर संपूर्ण पश्चिम विदर्भातला प्रश्न आहे. अमरावतीत, अकोल्यातला मूर्तिजापूर, दर्यापूर, बाळापूर, अकोट असा भाग खारपान पट्टा आहे. महिलांनी जमा केलेले पाणी देवेंद्रजी, तुम्ही पिऊन पहा, असे आव्हान देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहेत.