आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाते वाटपाचा फार्म्युला ठरला नाही:मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा करुन लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करू- नागपूरात फडणवीसांचे वक्तव्य

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमानतळावर ढोलताशांच्या गजर, भाजप कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह, पोलिसांचाही मोठा फौजफाटा

अजून खाते वाटपाचा कोणताही फार्म्युला ठरलेला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर विमानतळावर बोलताना दिली. प्रथम नगरागमनानिमित्त आगमन झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सत्तांतरामुळे अधिवेशन पूढे ढकलले

राज्यात सत्तांतरामुळे तसेच 18 जुलै रोजीचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रपती निवडणूकीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तत्पूर्वी मंत्रीमंडळ स्थापन करण्याचे प्रयत्न राहिल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वागत करताना भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते.
विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वागत करताना भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते.

लवकरच मंत्रिमंडळ स्थापन करू

राज्यात सध्या अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर मंत्रिमंडळ लवकर स्थापन होऊन मदतीचे ठोस निर्णय होण्याची गरज आहे. सत्तेच्या खेळात सामान्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी खंत राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष अधिवेशनात बोलताना व्यक्त केली होती. याकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळ स्थापन करू असे सांगितले.

आमच्या बाजूने निकाल लागणार

11 जुलै राेजी सर्वोच्च न्यायालयात शिंदे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. विदर्भाचा आम्ही यापूर्वीही विकास केला आहे. आताही अनुशेष दूर करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

स्वागत, ढोल- ताशे अन् जल्लोष​​​​​​​

कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन करतान देवेंद्र फडणवीस
कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन करतान देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वगृही नागपुरात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. नागपूर विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भातून त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला.

नागपुरकरांचे आभार

''नागपुरकरांनी माझ्यावर प्रेम केले. आमदार म्हणून निवडून दिले. आज उपमुख्यमंत्री म्हणून आलो तेव्हा जोरदार स्वागत झाले त्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्यावर मोठी जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी आ्म्ही प्रयत्न करणार आहोत.'' असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आता विदर्भाचा विकास करणार

''मला विश्वास आहे की, आम्ही आधीच योग्य चांगले काम केले आहे. मुख्यमंत्री आणि मी एकत्रित बसून विदर्भाचा विकास करणार आहे. विदर्भाला आता चिंता करायचे काम नाही, मागास भागांचा विकास करण्याचे प्रयत्न आहे.'' असेही फडणवीस म्हणाले.

नागपुरमध्ये आनंदाला उधाण

देवेंद्र फडणवीस नागपुर येथून मुंबईत जाताना विरोधी पक्षनेते होते, पण नागपूर येथे येताच ते उपमुख्यमंत्री म्हणून आले. त्यामुळे त्यांचे स्वागत जंगी होत असून नागपूर शहराचा चांगला विकास होईल अशी आशा भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यासह ढोल-ताशांचा गजरात त्यांचे स्वागत झाले असून आनंदाला उधान आले आहे.

देवेंद्र फडणवीस स्वगृही आले असून त्यामुळे सर्व घरच्यांना लोकांना कार्यकर्त्यांना आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...