आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • All Services Under One Roof Through Forest Service Centre, Information Of Forest Minister Mungantiwar, Said Prepare Schedule For Convenience Of Tourists

वन सेवा केंद्रामार्फत सर्व सेवा एका छताखाली:वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती, म्हणाले - पर्यटकांच्या सोयीने वेळापत्रक तयार करा

नागपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य नागरिकांना "आपले सरकार'च्या माध्यमातून अनेक सेवा सुविधा उपलब्ध होत असतात. याच धर्तीवर वन विभागामार्फत केंद्र तसेच राज्य शासनाच्या सेवा देण्यासाठी "वन सेवा केंद्र' सुरू करून यामार्फत वन विभागाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यात याव्यात, असे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. वनमंत्र्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्‍यातील व्‍याघ्र संवर्धन प्रतिष्‍ठान नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या शिवाय याशिवाय सर्वच व्याघ्र प्रकल्पात देण्यात येणाऱ्या सुविधांचे गुणांकन करण्यात यावे. याशिवाय पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीने एका वर्षाचे वेळापत्रक तयार करण्यात यावे असे मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्यात सध्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नवेगाव -नागझिरा, पेंच -बोर व्याघ्र प्रकल्प, मेळघाट आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहेत. राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्राकरिता व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. सर्व व्याघ्र प्रकल्प प्लास्टिकमुक्त असतील आणि संपूर्ण स्वच्छतेला प्राधान्य देणारे असावेत.

येणाऱ्या काळात या प्रतिष्ठानमार्फत राज्यातील व्याघ्र प्रकल्प सर्वदूर पोहोचवण्यासाठी तसेच येथे पर्यटकांची संख्या वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणे आवश्यक आहे. पर्यटकांची संख्या चांगल्या चांगल्या सोयी सुविधा निर्माण केल्या तरच वाढणार असल्याने यासाठी बीओटी किंवा पीपीटी मॉडेल कसा विकास करता येईल का याचा अभ्यास करण्यात यावा.

प्रत्येक व्याघ्र प्रकल्प प्रतिष्ठानने आपले स्वतःचे संकेतस्थळ तयार करून त्यावर संबंधित व्याघ्र प्रकल्पाची इत्यंभूत माहिती द्यावी. व्याघ्र प्रकल्पाचे फोटो, इतर माहिती या बरोबरच येथे असलेल्या पर्याप्त सुविधा यांची माहिती द्यावी. तसेच व्याघ्र प्रकल्प अधिकाधिक लोकप्रिय होण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात याव्यात असे ते म्हणाले.

काही वर्षांपूर्वी गिधाड आणि चिमणी यांच्या प्रजाती कमी होत असल्याचे दिसून आले होते. यानंतर वन विभागाने प्रयत्न करून ही संख्या वाढण्यासाठी प्रयत्न केले होते. आता सारस पक्षी वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे मदत घेण्यात यावी. वन विभागाच्या मानका पेक्षा वेगळ्या पद्धतीने दुभाजक केल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वन्यप्राण्यांचा अपघात होणे होऊन मृत्यू होत आहेत. हे थांबवण्यासाठी तातडीने नागपूरच्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना पत्र लिहून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

बातम्या आणखी आहेत...