आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे. या संपामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम न होता ती व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहील याची दक्षता घ्या. संप लांबल्यास पर्यायी व्यवस्था तयार ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आरोग्य विभागास दिले. संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रा.ज.पराडकर, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.अभ्युदय मेघे, जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालयाच्या कम्युनिटी मेडिसिन विभागाचे अधिष्ठाता डॉ.अभय गायधने, कस्तुरबा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पूनम वर्मा शिवकुमार, कार्यालय अधीक्षक गिरीश देव आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी संपाच्या पहिल्या दिवशी आरोग्य यंत्रणेवर जाणवलेल्या परिणामाची माहिती घेतली. संपकाळात पहिल्या दिवसाप्रमाणेच उर्वरीत दिवशीही आरोग्य व्यवस्था सुरळीत राहतील व रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला समोर जावे लागणार नाही, याची खबरदारी सर्व शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांनी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पुढील कालावधीसाठी तयार केलेल्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली. कस्तुरबा रुग्णालय व आचार्य विनोबा भावे रुग्णालयाने देखील आराखडा तयार करावा. शासकीय रुग्णालयांना मनुष्यबळाची कमतरता भासल्यास या दोनही रुग्णालयांनी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची तयारी बैठकीत दर्शविली. कस्तुरबा रुग्णालयाने आपले दिव्यांग मंडळ कायमस्वरुपी पूर्ववत सुरु ठेवावे अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यानंतर मंडळ सुरु ठेवणार असल्याचे कस्तुरबा रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सांगितले. आढावा बैठकीला उपस्थित जिल्हाधिकारी कर्डिले व इतर विभागाचे अधिकारी.
सावंगी येथील डॉक्टर व परिचारिका सज्ज जिल्हा सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला असल्याने आरोग्य विभागात रुग्णांची परवड होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आढावा बैठक घेतली असता ,सावंगी मेघे रुग्णालयातील डॉक्टर सज्ज ठेवण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी मागणी केल्यास डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आणि सोबतच नर्सिंग विद्यार्थ्यांची मागणी केली आहे. - डॉ अभ्युदय मेघे , विशेष कार्यकारी अधिकारी ,दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था,वर्धा
आढावा बैठकीला उपस्थित जिल्हाधिकारी कर्डिले व इतर विभागाचे अधिकारी. सावंगी येथील डॉक्टर व परिचारिका सज्ज जिल्हा सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला असल्याने आरोग्य विभागात रुग्णांची परवड होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आढावा बैठक घेतली असता ,सावंगी मेघे रुग्णालयातील डॉक्टर सज्ज ठेवण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी मागणी केल्यास डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आणि सोबतच नर्सिंग विद्यार्थ्यांची मागणी केली आहे. - डॉ अभ्युदय मेघे , विशेष कार्यकारी अधिकारी ,दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था,वर्धा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.